Dainik Maval News : पोळा, बैलपोळा ( Bail Pola) या नावाने ओळखला जाणारा सण वर्षभर शेतात राबणाऱ्या, शेतकरी मित्र बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा मराठी सण आहे. काही ठिकाणी श्रावणी अमावस्या किंवा काही ठिकाणी भाद्रपद अमावस्या या तिथीला (Pola) साजरा केला जातो. मावळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी भाद्रपद अमावस्या दिवशी ( Bailpola in Marathi) हा सण साजरा होतो. मावळात ( Maval Taluka) आज जागोजागी बैलपोळा सणाचा उत्साह दिसून येत आहे. (Information in Marathi)
वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे “बैलपोळ्याचा दिवस” होय. “बैलपोळा” हा सण भाद्रपद महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी येणारा एक सण आहे. विशेषत: हा सण महाराष्ट्र, छत्तीसगड मध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये या सणाला “बेंदूर” या नावानेही ओळखले जाते. हा सण भारतातल्या विविध ठिकाणीही साजरा केला जातो.
कृषीप्रधान भारत देश : ( Bail Pola In India )
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे बरेच लोक हे शेतीवरच अवलंबून आहेत. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतीतल्या कामासाठी बैलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आजच्या या आधुनिक युगात काही लोक हे शेतीसाठी ट्रॅक्टरचा व विविध यंत्रणाचा वापर करत आहेत. पण आजही काही लोक असे आहेत जे की, शेतीतील कामासाठी म्हणजेच नांगरणी, पेरणी यासाठी बैलांचा वापर करत आहेत. तसेच शेतीतील काही धान्य किंवा अवजारे आणायचे असतील तर बैलगाडीचा वापर केला जातो. शेतीचा व्यवसाय हा बैलांवरतीच आधारित असतो. परंतु आजच्या या आधुनिक युगात नवनवीन यंत्रणा आल्यामुळे कुठेतरी बैलांचे महत्त्व कमी होत चालले आहे.
असा साजरा होतो पोळा : ( Bailpola Festival)
बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी हा आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन काढतो. धुऊन काढल्यानंतर वेगवेगळ्या रंगांनी रंगवतो व सजवतो. बैलांच्या शिंगाला पण मस्त रंग देतो व त्यांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा घातल्या जातात. अशाप्रकारे प्रत्येक शेतकरी आपोआपल्या बैलांना सजवतो व सजवून झाल्यानंतर गावातील सगळ्या बैलांना एकत्रित आणून त्यांना पळवले जाते तसेच त्यांच्या पुढे नाचले पण जाते. बैल पळत असताना मुले त्यांचा आनंद घेत असतात. बैलांपुढे बेसूद नाचत राहतात. नंतर प्रत्येक जण आपोआपल्या बैलांना घरी घेऊन जातात. बैलांना घरी आणल्यानंतर त्यांची पूजा केली जाते व त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाकही बनवला जातो. मग बनवलेल्या पोळ्या या बैलांना खाऊ घालतात. घरातील वडीलधारी तसेच छोटे मुले ही बैलांच्या पाया पडतात. शेतकरी आपल्या बैलांची देवाप्रमाणे पूजा करतात.
मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता :
बैलपोळ्याच्या दिवशी ज्या लोकांच्या घरासमोरून बैल जातात तेही लोक बैलांची पूजा करतात. शहरामध्ये बैल नसल्यामुळे लोक कुंभाराकडून बनवलेली मातीची बैल घरी घेऊन येतात व त्यांची पूजा करतात. बैल पोळा या सणादिवशी बैलांचा वापर हा कोणत्याच कामासाठी केला जात नाही. आपण गाय व बैल तसेच कोणत्याही मुक्या प्राण्यांना मारले नाही पाहिजे. माणसांसाठी तर कोणी पण कृतज्ञता व्यक्त करू शकतो, परंतु मुक्या प्राण्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेषत: जगामध्ये फक्त भारतीय संस्कृतीमध्ये पहायला मिळते.
पौराणिक कथा :
एका प्रसिद्ध कथेनुसार श्रीकृष्णाच्या जन्मानंतर लगेचच कंसाने त्यांना मारण्यासाठी पोळासूर या नावाच्या राक्षसाला पाठवले होते, पण त्या राक्षसालाही श्रीकृष्णाने आपली लीला दाखवून मारून टाकले होते आणि सगळ्यांना अचंबित करून टाकले होते. तो दिवस भाद्रपद महिन्याच्या अमावस्येचा होता आणि त्या दिवसापासूनच या घटनेला पोळा म्हटले जाऊ लागले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया
