व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

ई-केवायसी संदर्भात कुणीही आर्थिक मागणी करीत असेल, तर त्यास लाभार्थींनी बळी पडू नये, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 20, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे.

ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

अशी करा ई-केवायसी प्रक्रिया :
1. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

2. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
3. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

4. यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
– *जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
– *जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
– *जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.

5. यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
6. त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

Ladki Bahin Yojana E-KYC

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News 


Previous Post

मोठी बातमी : श्री एकवीरा देवी नवरात्र उत्सव निमित्त लोणावळा परिसरात वाहतूक मार्गात बदल ; अवजड वाहनांना ‘नो-एंट्री’ । Karla

Next Post

मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gram Panchayat Office Balasaheb Thackeray Memorial Matoshree Gram Panchayat Construction Scheme

मावळ तालुक्यातील 'या' ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.