राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. महत्वाची बाब म्हणजे कालच (सोमवार, 12 डिसेंबर) रोजी शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस होता. त्यानंतर आज (मंगळवार) रोजी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ( NCP Leader MP Sharad Pawar Death Threat Phone Call Silver Oak Mumbai )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओक वर फोन करून, शरद पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे ठार मारण्याची धमकी ( Sharad Pawar Gets Death Threat ) दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार समोरील व्यक्तीने हिंदी भाषेत ही धमकी दिली. पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटर याबाबत तक्रार दिल्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात 294, 506 (2) भादंवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, सहा सैनिक जखमी
– ‘अस्सल’ इंद्रायणी तांदूळ विक्री महोत्सवाला उदंड प्रतिसाद, एका दिवसात सुमारे 10 टन तांदळाची विक्री