Dainik Maval News : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुतोवाच केलेल्या तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत अद्यापही संभ्रम दिसत आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गाला मावळ, खेड तालुक्यातील ठिकठिकाणच्या ग्रामस्थांकडून विरोध होताना दिसत आहे.
तळेगाव दाभाडे ते चाकण औद्योगिक वसाहत ते रांजणगाव मार्गे उरुळीकांचन असा हा प्रस्तावित रेल्वे मार्ग असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रासह राज्य सरकारचीही या प्रकल्पास मान्यता आहे. परंतु मावळ, खेड तालुक्यातील नेमक्या कोणत्या गावातून हा रेल्वे मार्ग जाणार हे अजूनही निश्चित नाही. अधिकृत डीपीआर प्रसिद्ध झालेला नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळेगाव दाभाडे ते उरुळीकांचन हा रेल्वे मार्ग होणार आहे, असे वक्तव्य केल्यानंतर शासनाने या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत डिपीआरला पुणे महानगर नियोजन समितीची अद्यापपर्यंत मान्यता घेण्यात आलेली नाही. ज्या गावातून रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे, ती गावे पीएमआरडीएच्या हद्दीत आहेत.
खेड तालुक्यात विरोध :
तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वेमार्गाला कुरुळी पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा प्रस्तावित मार्ग खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून तळेगाव- उरुळी कांचन रेल्वे मार्ग कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी, केळगाव आदी गावांच्या हद्दीतून जाणार असल्याचे बोलले जात असून याबाबत पंचक्रोशीतील नागरिक व शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मावळ तालुक्यातही विरोध :
तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या नव्या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे इंदोरी (ता. मावळ) गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणीत संपादित केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला असून आपले गाव यातून वगळावे असे सांगितले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया