Dainik Maval News : पेन्शनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मावळ तालुका इपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे तालुकाध्यक्ष दशरथ ढोरे, सचिव विजयकुमार राऊत व संघटक मनोहर बागेवाडी यांनी दिली.
इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती ही वृद्ध पेन्शनधारकांची संघटना देशातली २७ राज्यात कार्यरत आहे. पेन्शनधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी ही समिती गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे विविध प्रकारची आंदोलने, चर्चा आदी विविध मार्गांनी पाठपुरावा करत आहे.
पंतप्रधान, केंद्रीय वित्तमंत्री व श्रममंत्री यांच्याशी अनेकवेळा चर्चा होऊनही सकारात्मक निर्णय होत नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध कार्यालयांवर मोर्चे व आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
त्याच अनुषंगाने मावळ तालुका इपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता वडगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील ६० ते ८० वयोगटातील पेन्शनधारक सहभागी होणार आहेत, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया