Dainik Maval News : गावागावांत सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून “प्रशांतदादा भागवत युवा मंच” तर्फे महिला-भगिनींसाठी एक आगळावेगळा सोहळा सुरू होत आहे.
“मनोरंजन संध्या २०२५” या नावाने आयोजित केलेल्या या उपक्रमात महिलांसाठी हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा भरगच्च कार्यक्रमांचा मेळा रंगणार आहे. आज, सोमवार ( दि. २२ सप्टेंबर) रोजी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, गोळेवाडी येथे या उपक्रमाचा भव्य शुभारंभ होणार असून तब्बल नऊ गावांमध्ये हा सांस्कृतिक उत्सव रंगणार आहे.
कार्यक्रमांचे ठिकाण व तारखा पुढीलप्रमाणे :
२२ सप्टेंबर – गोळेवाडी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
२३ सप्टेंबर – वारंगवाडी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
२४ सप्टेंबर – आंबी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
२७ सप्टेंबर – जांभुळ (भैरवनाथ मंदिर)
२८ सप्टेंबर – वराळे (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
२९ सप्टेंबर – मोहितेवाडी (मारुती मंदिरा समोर)
३० सप्टेंबर – समता कॉलनी
१ ऑक्टोबर – साते (दत्त मंदिरा समोर)
६ ऑक्टोबर – भीमाशंकर कॉलनी
सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता रंगणार असून, या सोहळ्याचे सूत्रसंचालन लोकप्रिय प्रणालीताई बधाले करणार आहेत. विशेष म्हणजे – प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू आयोजकांतर्फे देण्यात येणार आहे.
गावोगावी सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला नवी उभारी देण्याचे कार्य प्रशांतदादा भागवत सतत करत असतात. महिलांसाठी आनंद, उत्साह आणि बंधुभाव वाढवणारा हा उपक्रमही त्याच ध्येयधोरणाचा एक भाग आहे. “मोठ्या संख्येने उपस्थित राहा, हा सोहळा तुमचाच आहे. आपल्या उत्साहामुळे कार्यक्रमाची शोभा वाढेल,” असे आवाहन प्रशांत भागवत यांनी महिला-भगिनींना केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया