Dainik Maval News : राज्यातील मराठवाडा भागात सध्या पावसाता धुमाकूळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सह्यादी घाट माथा भागातही पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणत कायम आहे. हवामान विभागाने, आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील काही तासांत अहमदनगर, नाशिक, पुणे येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
३० सप्टेंबरपर्यंत मान्सून कायम :
बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान ३० सप्टेंबर पर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही.
दुपारनंतर पाऊस वाढण्याचा अंदाज :
सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपार नंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य नियोजन करावे :
२७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नये – प्रशासन
राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी जावे :
राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या व कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनास व बचाव पथकांना सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पथके व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क –
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई – ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ९३२१५८७१४३
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र धाराशिव – ०२४७२-२२७३०१,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र बीड – ०२४४२-२९९२९९,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र सोलापूर – ०२१७-२७३१०१२,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जळगाव – ०२५७-२२१७१९३/२२२३१८०
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया