Dainik Maval News : कार्ला येथील आई एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘नाहरकत प्रमाणपत्र’ मिळताच सभा मंडपाचे काम तातडीने सुरु करण्यात येईल, असे एकविरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातील सोईसुविधाची पाहणीदरम्यान डॉ. गोरे यांनी सांगितले.
डॉ. गोरे म्हणाल्या, मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील प्राचीन आणि पवित्र एकविरा माता मंदिर असून ते महाराष्ट्रातील महत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
या परिसरात येणाऱ्या भाविकांकरिता वाहनतळ, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सोयीशी निगडित विविध कामे अद्यापही प्रलंबित आहेत. पीएमआरडीए व एमएमआरडीएच्यावतीने कामे करण्यात येत असून दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबत दिवाळीनंतर विधानभवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येईल; या परिसरातील प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल, असे डॉ. गोरे म्हणाल्या.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाच्या तयारीचा घेतला आढावा :
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाच्यावतीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. पायरी मार्गावर रेलिंग बसविणे, मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षण, लाकडी डोलीतून दर्शन घेणाऱ्या भक्तांची सुरक्षितता, आरोग्यसेवा सुविधा आणि पार्किंग समस्येचे निराकरण यावर विशेष भर देण्यात आला. “भाविकांची सुरक्षितता आणि सोय ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व कामे करण्यात येतील, असेही डॉ. गोरे म्हणाल्या. यावेळी परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया