Dainik Maval News : श्री एकविरा देवी नवरात्र उत्सव २०२५ दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांचा ओघ कार्ला येथील मंदिराकडे जाणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मौजे कार्ला फाटा येथून श्री एकविरा देवी मंदिर पायथ्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड व मोठ्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी कार्ला फाटा येथे हाइट बॅरिकेटिंग उभारण्यात येणार आहे. ( Heavy vehicles banned in Karla Phata during Navratri festival )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया