Dainik Maval News : गावागावांत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाची गोळेवाडीत धमाकेदार सुरुवात झाली. हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला.
भर पावसातही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. या सोहळ्याला आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच माधुरीताई जाधव, माजी सरपंच अलकाताई जाधव, सुमनताई मापारी, रोहिदासजी जगदाळे, पोलीस पाटील भानुदाजी दरेकर, विष्णू गोळे, दत्ता लोंढे, सुरेश घोजगे यांच्यासह ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते नामदेवभाऊ गराडे, भानुदास दरेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच वारिंगेवाडीत झालेल्या कार्यक्रमास अहिल्याताई मांडेकर, अध्यक्षा दिपालीताई तोडकर, सचिव ज्योतीताई शिंदे, कार्याध्यक्ष मोहिनीताई मांडेकर, सचिव मंदाताई वारिंगे, उपाध्यक्ष अनिता करके, सचिव सुप्रिया कलवडे, सरपंच सरीखाताई धुमाळ, अनिताताई सावले – बीजेपी महिला आघाडीच्या अध्यक्षा याही प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत भागवत म्हणाले, “मनोरंजन संध्या २०२५ हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर महिलांच्या सहभागातून गावागावात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा उपक्रम आहे. समाज घडविण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या कलागुणांना व उत्साहाला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. या उपक्रमातून एकोपा, आत्मविश्वास आणि आनंदाची नवी प्रेरणा गावागावांत पोहोचेल, हीच खरी ताकद आहे. यापुढेही अशा संध्यांचे आयोजन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत राहणार आहे.”
या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना आणि सामाजिक सहभागाला नवे व्यासपीठ मिळाले असून, मावळात सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम