व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन । Prakash Devale Passes Away

शिवसेनेतर्फे 1996 मध्ये त्यांनी विलासराव देशमुख यांचा पराभव करून विधान परिषदेची निवडणूक जिंकली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 24, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Founder of Pratishirdi Sai Sansthan in Shirgaon Maval Pune former MLA Prakash Devale Passes Away

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिवसेनेचे माजी आमदार आणि मावळ तालुक्यातील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक, ( Founder of Pratishirdi Sai Sansthan in Shirgaon Maval Pune) मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे मंगळवारी (दि. 23) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, बुधवार (दि. 24 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजता वैकुंठ स्मशानभूमी (पुणे) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

  • पुणे जिल्ह्यातील जुन्या पिढीतील कट्टर शिवसैनिक अशी प्रकाश देवळे ( former MLA Prakash Devale Passes Away ) यांची ओळख होती. शिवसेनेचे ते पुणे जिल्हा प्रमुखही होते. शिवसेनेतर्फे 1996 मध्ये त्यांनी विलासराव देशमुख यांचा पराभव करून विधान परिषदेची निवडणूक जिंकली होती. यामुळे त्यांची राज्याच्या राजकारणात चर्चा झाली होती. परंतु यानंतर त्यांनी सक्रीय राजकाणातून स्वतःला बाजूला केले.

प्रकाश देवळे यांनी पुढे स्वतःला सामाजिक आणि आध्यात्मिक कामात जोडून घेतले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिरगाव येथे प्रती शिर्डी या नावाने श्री साईबाबांचे भव्य मंदिर त्यांच्या पुढाकारातून उभारले गेले. शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिराप्रमाणे हुबेहुब हे मंदिर असल्याने, ज्या भाविकांना शिर्डी येथे जाणे शक्य होत नाही, त्यांना मावळ तालुक्यातच शिर्डी प्रमाणे धार्मिक वातावरण अनुभवण्याची संधी मिळाली.

नोकरदार, बांधकाम व्यावसायिक, सिनेमा निर्माते व दिग्दर्शक, राजकारणी ते प्रतिशिर्डीचे शिल्पकार असा प्रकाश देवळे यांचा उल्लेखनीय जीवनप्रवास होता. माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया


dainik maval jahirat

Previous Post

पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध ; “आरोपींवर कारवाई व्हावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी”

Next Post

प्रशांत दादा भागवत आयोजित “मनोरंजन संध्या” कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात ; गोळेवाडी, वारिंगेवाडीत महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Manoranjan Sandhya program organized by Prashant Bhagwat in Golewadi Waringewadi Maval

प्रशांत दादा भागवत आयोजित "मनोरंजन संध्या" कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात ; गोळेवाडी, वारिंगेवाडीत महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.