Dainik Maval News : जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (२९ सप्टेंबर) दुपारी वरोळे ( ता. मावळ ) येथे घडली.
ओंकेश लक्ष्मण मंडलपवाड (२१, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुद्र कांबळे (वराळे), पियुष कुमार (वराळे), प्रतिक ताथळे (तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला पकडून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने डोक्यात वार केला.
फिर्यादीने तो वार चुकवल्याने तो डाव्या गालावर बसला आणि त्यांना दुखापत झाली. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल