व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल । Maval Crime

तोतया इसम उभा करून त्याच्या द्वारे फिर्यादींच्या नावाने ओळखपत्र तयार करून जमीन व्यवहार करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 26, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द येथील जमिनीच्या व्यवहारात बनावट इसम उभा करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी सहा जणांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड व हॉटेल व्यावसायिक पी. रशीद उर्फ पी. रशीद अब्दुला (वय ४०, रा. हाल बु. खोपोली, ता.खालापूर, जि.रायगड, मूळ रा.केरळ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या नावाचा बनावट आधार घेऊन तोतया इसम उभा केल्याची फिर्याद आहे.

तोतया इसम उभा करून त्याच्या द्वारे फिर्यादींच्या नावाने ओळखपत्र तयार करून जमीन व्यवहार करण्यात आला. मौजे टाकवे खुर्द, ता. मावळ, जि. पुणे येथील गट नं. ८९ क्षेत्र ७९.२० आर इतकी शेतजमीन ही फिर्यादीच्या नावे असून त्यावर शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई (शाखा – धनकवडी) यांचा बोजा असल्याचे आरोपींना माहीत होते. तरीही, आरोपी उत्तम हरिदास पाटील व भगत संदीप पंजाबराव यांना खरेदीदार दाखवून तर विशाल अशोक लोहार, चंद्रमोहन मसीन यांना साक्षीदार बनवून हा खोटा व्यवहार करण्यात आला, असे फिर्यादीत नमुद आहे.

विशेष म्हणजे, खरेदीखत लिहून देणारा इसम खरा आहे की तोतया याची खात्री न करता व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथे कार्यरत असलेले कपिल मोरे यांनी दस्त क्र. १२३८०/२०२५ अन्वये खरेदीखत नोंदवून दिल्याचे यातून समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम


Previous Post

आमदारांचा संवाद – जनांचा प्रतिसाद ; आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद उपक्रमाला गावोगावी उदंड प्रतिसाद । Maval News

Next Post

दिलासादायक : पाच लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या ‘या’ नऊ आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना निधी मिळणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde

दिलासादायक : पाच लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या 'या' नऊ आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना निधी मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.