Dainik Maval News : मेफेड्रॉन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने गुरुवारी (दि. १ ) सायंकाळी मावळ तालुक्यातील आंबी येथून ताब्यात घेतले.
संतोष अशोक कोरडे (३५, ताजे, ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ६३ हजार ९०० रुपये किमतीचे १६.३९ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर जैनक यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी कोरडेला कार सह ताब्यात घेतले. पोउपनी खरात हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय