Dainik Maval News : “गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे, या राष्ट्रीय अभियानांतर्गत वडगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले.
दिनांक २ ऑक्टोबर २०२५ परमपूज्य महात्मा गांधी यांची जयंतीचे व स्वच्छता ही सेवा अभियानाच्या औचित्य साधून वडगाव नगरपंचायत मार्फत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शहरात ३६५ दिवस स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी ज्यांचे काम चांगले आहे अशा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचे सन्मान करण्यात आले. तसेच शहराच्या हद्दीवरती असलेला कातवी-तळेगाव रस्ता या ठिकाणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अधिकारी कर्मचारी नागरिक सर्वांनी मिळून रस्त्याच्या दुतर्फा पडलेला कचरा उचलून स्वच्छता केली यामध्ये सुमारे ७० कर्मचारी सहभागी होते व सर्वांनी मिळून सुमारे तीन मेट्रिक टन कचरा जमा केला गेला.
तसेच यापूर्वी अभियान कालावधीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल रमेश कुमार सहानी स्कूल, अध्यापक विद्यालय, कला वाणिज्य बी बी ए महाविद्यालय वडगाव या सर्वांनी अभियानात भाग घेत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वच्छता रॅली, स्वच्छता शपथ, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता अशाप्रकारे विविध उपक्रम राबवत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तसेच या अभियान कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा- सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानांतर्गत वडगाव नगरपंचायत चे सर्व सफाई कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व सफाई कर्मचारी यांनी आरोग्या संबंधी घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व सफाई कर्मचारी यांना शासकीय योजणांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने ज्या कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – आयुष्मान कार्ड काढण्यात आले व प्रधानमंत्री आवास योजना शहरी २. ० योजनेची माहिती देण्यात आली आली व पात्र कर्मचारी यांना लाभ घेण्यास सांगितले.
स्वच्छता ही सेवा अभियानाची सांगता करतेवेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांनी शहरातील नागरिकांना कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीत वर्गीकृत स्वरूपात टाकावा तसेच प्लास्टिकचा वापर टाळावा व नगरपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, उघड्यावर पडणारे कचऱ्यामुळे शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबवावे व नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे. शहरात नियमित कचरा पडणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार येणार असून जे नागरिक उघड्यावर कचरा टाकताना आढळतील अशा नागरिकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय