Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सायकल बँक उपक्रमाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेत येण्या जाण्याची गरज ओळखून शिळींब इन्स्टिट्यूट संस्थेच्या ग्रीन स्क्वॉड उपक्रमांतर्गत वारू केंद्रशाळा येथे एकूण १२ सायकलींचे वाटप करण्यात आले.
या सायकलींच्या सहाय्याने मावळ मधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत नियमितपणे पोहोचणे सोयीचे होणार आहे. शैक्षणिक प्रवास सुलभ करून ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. या पूर्वी देखील या संस्थेच्या माध्यमातून शाळेसाठी परसबाग, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच काही भौतिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
या कार्यक्रमास काले कॉलनी बीट चे विस्तार अधिकारी संदीप काळे, वारू केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनंदा दहितुले, वारू सरपंच निलम साठे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा निंबळे, वारू शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ आडकर, राजेश राऊत, नितीन वाघमारे, संजय ठाकर, संजय ठुले, अंकुश येवले, कविता दंडवते, मेघा लोळे, प्रतिभा ठाकूर, अनिकेत कळसकर, मंजुषा सुराखिया, राहुल कांबळे आणि ऋषिकेश साळवे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन नवनाथ आडकर यांनी केले तर संजय ठाकर यांनी आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय