2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने “लोकसभा प्रवास योजना” कार्यान्वित केली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित कल्याण लोकसभा आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीची संघटनात्मक व्हर्चुअल मिटिंग पार पडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बैठकीत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत चरण-2 मध्ये करावयाच्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनार्थ आढावा घेऊन अनेक बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले.
यावेळी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा प्रभारी आमदार प्रसाद लाड, कल्याण लोकसभा प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार ऐलानी, आमदार तमिल सेलवन, आमदार निरंजन डावखरे, आमदार कालिदास कोळंबकर, संयोजक शशिकांत कांबळे, राजेश शिरवाडकर कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. ( BJP Lok Sabha Pravas Yojana Bala Bhegade Made Plan For Kalyan and South Central Mumbai Lok Sabha constituencies )
अधिक वाचा –
– लोणावळा येथे ‘शरदचंद्रजी श्री-2022’ राज्यस्तरीय महिला आणि पुरुष शरीरसौष्ठव स्पर्धा । Lonavla News
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘आयडियल स्टडी ॲप’