Dainik Maval News : अखंड मराठा समाज मावळ तालुका यांच्या वतीने गुणवंतांचा सन्मान सोहळा वडगाव मावळ येथे पार पडला. यामध्ये मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवेत रुजू झाले असल्याने मावळ तालुका मराठा समाजाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना त्याच्या जिवनातील अनेक अडचणी वर कशा पद्धतीने मात करत यशस्वी होण्यासाठी धडपडीचा पाडा वाचला. तर काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, मावळ तालुका हा सर्वगुणसंपन्न असून मावळ तालुक्यात एक मोफत प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात यावी. यामुळे गरिब विद्यार्थ्यांना यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. तर मावळ तालुक्यात मराठा समाजाचे भवन उभारणी करण्यात यावी असे मत यावेळी विद्यार्थ्यांनी बोलताना मत व्यक्त केले.
मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी पोलीस भरती,महसूल विभाग,सिए स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण,राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग,ग्रामविकास विभाग,सहकार विभाग अशा अनेक विभागात रुजू झाले आहे.
यामध्ये अक्षदा लांडगे (एमपीएससी उत्तीर्ण)हर्षदा दळवी (तलाठी जळगाव)अवंती मोहिते (पोलीस लोणावळा)श्रुती मालपोटे (पोलीस निरीक्षक कल्याण)महेश असवले (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल दिल्ली)शुभांगी जाधव (आर्मी सेवेत उत्तराखंड)चेतन केदारी(ग्रामविकास अधिकारी, रत्नागिरी)रवी केदारी (राज्य उत्पादक शुल्क, वसई)राजू असवले (महसूल सहाय्यक संचालनालय, येरवडा)संतोष ठाकर (पोलीस मुंबई)अक्षय पिंपळे (रेल्वे पोलीस मुंबई)गुरुदेव गरुड (सिए)सदगुरु आगळमे (पिंपरी-चिंचवड पोलीस)वैभव आंबेकर (पिंपरी-चिंचवड पोलीस)प्रसाद इंगुळकर (तलाठी)रामकृष्ण तिकोणे(नोंदणी व मुद्रांक विभाग)
विशाल हरिहर (वनविभाग)अर्चना जाधव (सहाय्यक निबंधक)पंकज पिंपरे (सिए)शुभदा वरघडे (वनविभाग)प्रियांका जाधव(मुंबई पोलीस)निशा लालगुडे(पुणे पोलीस)ओंकार निंबळे(मुंबई पोलीस)अभिषेक काजळे (मुंबई पोलीस)सानिका काजळे (मुंबई पोलीस)स्नेहल दाभाडे (महसूल सहाय्यक)वैष्णवी यादव(मुंबई पोलीस)ओमकार भुडे(मुंबई पोलीस)नागेश मोहिते (मुंबई पोलीस)प्रतीक गायकवाड(पोलीस)अजिक्य सावंत (तहसिलदार)ज्ञानेश्वर गोपाळे( सीए)निलेश खेडेकर (उपजिल्हाअधिकारी)दत्ता शेडगेरा (महसूल सहायक)अर्चना दहीभाते (सहकार निबंधक पुणे) वेदांगी आसवले(सिए) निलेश कोकरे (पोलीस)सागर तळपे (राज्यउत्पादन शुल्क उपनिरीक्षक)करीना मोरे (पोलीस) यांचा मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मावळ तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर अखंड मराठा समाजाचे अनेक मराठा सेवक उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर