Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्यांचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार ग्रामीण पोलील दलातील तब्बल 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मावळ तालुक्यातील वडगाव मावळ पोलीस ठाणे आणि कामशेत शहर पोलीस ठाण्याचे पीआय ( पोलीस निरिक्षक ) यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील 10 पोलीस निरीक्षकांच्या तर, 4 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षण पोलीस निरिक्षक कुमार रामचंद्र कदम यांची बदली सासवड येथे करण्यात आली आहे, तर कामशेत शहर चे पीआय रविंद्र दत्तात्रय पाटील यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
यासह वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नवीन पीआय ( वरिष्ठ पोलीस निरिक्षक ) म्हणून अभिजित सुभाष देशमुख ( सध्या कार्यरत परकीय नागरिक नोंदणी कक्ष ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, कामशेत शहर पोलीस ठाण्याचे नवीन पीआय ( वरिष्ठ पोलीस निरिक्षक ) म्हणून शंकर मोहन पाटील ( सध्या कार्यरत उरळी कांचन येथे ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षकांनी बुधवारी (दि. 8) रात्री उशीरा बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.,
सर्व बदल्यांची यादी पुढीलप्रमाणे (कोठून कुठे)
1. कुमार रामचंद्र कदम (वडगाव मावळ ते सासवड),
2. सचिन दत्तात्रय वांगडे (हवेली ते उरुळी कांचन),
3. रवींद्र दत्तात्रय पाटील (कामशेत ते नियंत्रण कक्ष),
4. अभिजित सुभाष देशमुख (परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते वडगाव मावळ),
5. वैशाली रावसाहेब पाटील (बारामती तालुका ते हवेली),
6. शंकर मनोहर पाटील (उरुळीकांचन ते कामशेत),
7. चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती वाहतूक ते बारामती तालुका),
8. श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी (नियंत्रण कक्ष ते बारामती वाहतूक),
9. ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी (सासवड ते नियंत्रण कक्ष),
10. सपोनि महादेव चंद्रकांत शेलार (नारायणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा),
11. सपोनि नितीन हनुमंत खामगळ (वेल्हा ते नियंत्रण कक्ष).
12. सपोनि प्रवीण महादेव सपांगे (यवत ते नारायणगाव),
13. किशोर विठ्ठल शेवते (वाचक अपोअ, पुणे ते वेल्हा),
14. सपोनि गजानन रतन चेके (वाचक उविपोअ बारामती ते नियोजित पोलिस ठाणे निरा-नृसिंहपूर)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर

