Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलातील कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असणारे, तसेच विविध एसआयटी वर काम केलेले, गुन्ह्याची उकल करण्यात माहिर असणारे पोलीस अधिकारी असा लौकीक असणारे अभिजित देशमुख यांनी मावळचे तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या वडगाव मावळ पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे मावळते पोलीस निरिक्षक कुमार कदम यांनी सासवड येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अभिजित सुभाष देशमुख यांची बदली झाली आहे. पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शासन नियमानुसार त्यांची बदली झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बदलीचे आदेश जारी केले, त्यानुसार अभिजित देशमुख हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झाले आहेत. अभिजित देशमुख यांनी २००५ मध्ये राज्य पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून प्रवेश केला. कारकिर्दीच्या प्रारंभी त्यांनी २००६ ते २००७ या काळात गडचिरोली जिल्ह्यात व त्यानंतर ठाणे ग्रामीण, कोल्हापूर, सांगली अशा विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे. पोलीस उपनिरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक ते पोलीस निरिक्षक अशी त्यांचा कारकिर्द राहील आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
