Dainik Maval News : पूज्य भिक्खू बुद्धघोष मेता थेरो यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पोर्णिमा तीन महिने ध्यान वंदना व धम्म देसना करण्यात आली. याचा सांगता समारोह अर्थात वर्षावास सांगता समारोह व कठीण चिवरदान कार्यक्रम बेडसे येथील ऐतिहास लेणी पायथ्याशी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सकाळ सत्रात महाबोधी वृक्ष पूजा, सामूहिक ध्यान साधना, भिक्खू संघ भोजनदान हे कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर बुद्धपूजा, त्रिरत्न वंदना, परित्रानपाठ व आशीर्वाद गाथा घेण्यात आली. शेवटी विशेष धम्म देसना भोजन दान व कठीण चिवरदान करण्यात आले. यावेळी मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवड परिसरातून हजारो बुद्ध अनुयायी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका अध्यक्ष तथा संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, युवक अध्यक्ष अंकुश सोनवणे, कमलशील म्हस्के, विजय जाधव, उद्योजक किशोर वाघमारे, छाया इंगळे, देवानंद भालेराव, संयोजक समितीचे सर्व सदस्य, संघमित्रा महिला संघ कामशेत चे सदस्य तसेच हजारो बुद्ध अनुयायी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सूर्यकांत वाघमारे म्हणाले की याठिकाणी स्थापन होत असलेली ही मॉनेस्ट्री तथागत गौतम बुद्धाच्या विचारांचा ठेवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरां च्या विचारांचा वारसा या ऐतिहास बुद्ध लेणी च्या पायथ्याला निर्माण होत आहे, याचा आम्हाला मावळकरांना सार्थ अभिमान आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा