एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ( National Horticulture Mission ) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ( Horticulture Development Mission ) जुन्या फळबागाचे पुनरुज्जीवन आंबा पिकांसाठी राज्यात हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. याचे कारण योग्य मशागत पद्धत न अवलंबणे, नांग्या न भरणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी बाबीमुळे उत्पादकता कमी होत आहे. नवीन लागवडीप्रमाणे जुन्या फळबागांची उत्पादकता वाढवणे ही महाराष्ट्र राज्याची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.
या घटकाअंतर्गत जुन्या फळबागाच्या पुनरुज्जीवनासाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के आणि जास्तीत जास्त रुपये 20 हजार प्रति हेक्टर या प्रमाणे कमीतकमी अर्धा एकर ते पाच एकर क्षेत्रासाठी अनुदान देय आहे. सर्वसाधारणपणे ज्या बागेतील 50 झाडांची उत्पादकता कमी झालेली असेल, त्याच फळबागांना या योजनेत लाभ देण्यात येतो.
हेही वाचा – लम्फी आजाराचा प्रादुर्भाव : कार्ला येथे 130 पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण
पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकाचे वय पुढीलप्रमाणे असावे;
आंबा – कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 50 वर्ष
संत्रा – कमीत कमी 10 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्ष
या योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे;
- विहित नमुन्यात अर्ज (ऑनलाईन)
- 7/12 फळपिकाची नोंद असलेला
- फोटो
- आधारकार्ड झेरॉक्स
- आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
- हमीपत्र
- लाभार्थी अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवर नोंदणी करावी
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मसाला पिके विकास कार्यक्रम : राज्यात मसाल्याच्या पिकांची उत्पादकता वाढीवणे व चांगल्या प्रतीचे मसाला पदार्थ निर्यातीसाठी उत्पादन करणे या साठी एकत्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत मसाला पिक विकास कार्यक्रम राबवला जात आहे.
हळद पिक रोपवाटिका कार्यक्रम उद्देश : सुधारित हळद उत्पादन वाणाची रोपवाटिका स्थापन करून शेतकऱ्यांना हळद बियाने वाटप करणे, हळद पिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढीवणे, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, हळद पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन देणे, निर्यातक्षम हळद पिकाचे उत्पादन वाढवणे.
अनुदान : हळद पिक – कंदवर्गीय मसाला पिक ( हळद ) सरासरी लागवड खर्च रुपये 30 हजार इतका असुन लाभार्थी शेतकऱ्यास या योजनेमध्ये खर्चाच्या 40 टक्के रुपये 12 हजार अनुदान देय आहे. एका लाभार्थीस एक हेक्टर पर्यंत लाभ मिळतो.
हेही वाचा – मावळ तालुक्यात पसरतोय हा भयंकर आजार, शेतकरी प्रचंड चिंतेत, उर्से गावात कहर
अर्ज कुठे करावा ? शेतकऱ्यांनी या योजना सह कृषि विभागाच्या सर्व योजनाचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. ( National Horticulture Mission Revival of Old Orchards Under Integrated Horticulture Development Mission )