शासनाच्या विविध योजना यांसह पिक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मदत मिळवण्यासाठी ई – पीक पाहणी ( E-Peek Pahani ) केल्याची नोंद असणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी व्हर्जन दोन ( E Peek Pahani App ) हे ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे सांगण्यात आले आहे.
मावळ तालुक्यात ( Maval taluka ) पवनमावळ भागातील शिळींब ( Shilimb Village ) या गावातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ई – पीक पाहणी पेरा कसा नोंदवावा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पोलीस पाटील संदीप बिडकर, तलाठी राम पुंडे, कोतवाल गोपाळ जाधव यांनी शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवर ई पिक पाहणी नोंद कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवले. ( Training of E-Peek Pahani App To Farmers )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ई-पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांनी चालू पीक पेरा नोंदवला नाही तर, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यास सरकारी पंचनामा करता येणार नाही. तसेच नुकसान भरपाई मिळणार नाही, याची सुचना यावेळी शेतऱ्यांना देण्यात आली. ई-पीक पाहणी ॲपमध्ये पीकपेरा नोंदवताना काही समस्या आल्यास शेतकऱ्यांनी पोलीस पाटील, तलाठी, रेशन दुकानदार यांच्याशी संपर्क करावा, असेही सांगण्यात आले.
शेतकऱ्यांना सुचना;
मोबाईलवर प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी ॲपचे नवीन व्हर्जन अपडेट करावे. तसेच दिनांक 15 सप्टेंबर 2022 च्या आत सर्व शेतकऱ्यांनी माहिती भरावी. यासह वोटर हेल्पलाईन हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन त्याद्वारे मतदान कार्ड आणि आधार कार्ड यांची जोडणी करावी. ( Training of E-Peek Pahani App To Farmers By Administration At Shilimb Village In Maval taluka )
अधिक वाचा –
गोधनेश्वर मंदिर : मावळच्या डोंगररांगात लपलेलं अद्भुत रहस्य
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पुरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!