Dainik Maval News : सुदवडी गावात ( ता. मावळ ) अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २३ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजता ओढ्याच्या काठावर करण्यात आली.
या प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अंदाजे ६० वर्षीय महिलेवर गुन्हा नोंदविला आहे. ती येलवाडी, हवेली येथे राहत असून ती फरार आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सुदवडी गावच्या हद्दीत छापा टाकला असता, लोखंडी टाकीत सुमारे ४ हजार लिटर गूळ-मिश्रित कच्चे रसायन आणि तयार हातभट्टीची दारू असा २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी दारू निर्मितीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून आरोपी महिलेस शोध सुरू आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल




