व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या भाषणाची आणि त्यांनी सांगितलेल्या किस्स्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 22, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Talegaon Dabhade Muralidhar Mohol told story of NCP MLA Sunil Shelke offering party entry in 2019 elections

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोमवारी (दि. 20 ऑक्टोबर ) भव्य अशा समारंभात करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांसमवेत राज्यातील मंत्री दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या भाषणाची आणि त्यांनी सांगितलेल्या किस्स्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या भाषणात 2019 च्या विधानसभा निवडणुकीबाबतचा एक किस्सा सांगितला. मुरलीधर मोहोळ म्हणाले, “2019च्या विधानसभा निवडणुकी वेळचा एक किस्सा आहे. जो सुनील शेळके आणि मलाच माहिती आहे. 2019ला जेव्हा विधानसभा निवडणूक लागली, त्यावेळेस सुनील शेळके आणि मी दोघेही भाजपमध्ये होतो. त्यावेळी मावळमधून उमेदवारी मिळावी, यासाठी सुनील शेळके हे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना जेव्हा समजलं की भाजपमधून आपल्याला तिकीट मिळू शकत नाही, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली.”

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील शेळके यांनी पहिला फोन मला केला आणि म्हणाले, “माझी उमेदवारी कट झाली, मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि आता मला उमेदवारी मिळाली. तुमची ही कोथरूडमधून उमेदवारी कट झाली आहे. त्या ठिकाणी दादा ( चंद्रकांत पाटील ) आले आहेत, त्यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील माझ्यासोबत राष्ट्रवादीमध्ये चला,” अशी ऑफर आपल्याला सुनील शेळके यांनी त्यावेळी दिल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मोहोळ पुढे म्हणाले, “मात्र मी त्यांना सांगितलं की, मी दिल्या घरी सुखी आहे आणि तुम्ही देखील भाजप सोडून जाऊ नका, असं सुनील शेळके यांनी सांगितलं. त्यावर त्यांनी, मी आता परतीचे दोर कापले आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं भलं झालं. आणि मी भाजपमध्येच राहिलो आणि माझं देखील भलं झालं.” असा 2019 सालचा किस्सा मोहोळ यांनी सांगितला. यानंतर सभास्थानी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच 


Previous Post

वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त

Next Post

भाऊबीजेच्या दिवशी ‘या’ 5 चुका बिलकूल करू नका ; जाणून घ्या भाऊबीज साजरी करण्याची योग्य वेळ । Bhaubeej 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Do not make these mistakes on Bhaubeej Know right time to celebrate Bhaubij in Diwali

भाऊबीजेच्या दिवशी 'या' 5 चुका बिलकूल करू नका ; जाणून घ्या भाऊबीज साजरी करण्याची योग्य वेळ । Bhaubeej 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet Accident Car catches fire on flyover on old Pune-Mumbai highway One dies of burns

Kamshet Accident : कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलावर कारला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू

May 5, 2026
PMRDA budget of Rs 4 Thousand 628 crore approved PMRD should prepare structural plan said CM Fadnavis

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; ‘पीएमआरडीए’ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

May 5, 2026
electricity problem in Maval will be solved Planning for electricity supply in Maval constituency has begun

मावळमधील विजेची समस्या सुटणार ; पुढील २० वर्षात होणारी वाढ लक्षात घेऊन मावळ लोकसभा क्षेत्रात वीज पुरवठ्याचे नियोजन

May 4, 2026
Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.