व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 17, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली असून 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये हे स्पर्धात्मक अभियान काही नवीन उपक्रमांसह राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण 72 कोटी 22 लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

Novel NIBR Ads

अभियानाची व्याप्ती
या अभियानासाठी शाळांची विभागणी (अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि (ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर राबविण्यात येईल.

अभियानाची उद्दिष्टे
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

अभियानाचा कालावधी
या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 हा कालावधी असेल. 3 नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. तर, 31 डिसेंबर 2025 रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यानंतर अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल.

अभियानाचे स्वरूप
अभियानात सहभागी होऊन स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा- 38 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी- 101 गुण आणि शैक्षणिक संपादणूकसाठी- 61 गुण असे एकूण 200 गुण असतील.

Novel NIBR Ads

मूल्यांकन समिती
अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार असून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी कोकण विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली, वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली तर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये तालुकास्तरावरील मूल्यांकनासाठी प्राथमिक स्तरावर समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावरील मूल्यांकनासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती असेल. जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर विभाग स्तरावरील मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. राज्य स्तरावरील मूल्यांकनाचे कार्य करण्यासाठी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल.

पारितोषिके
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असेल. जिल्हास्तरावर (मुंबई शहर एक जिल्हा, मुंबई उपनगर एक जिल्हा) प्रथम पारितोषिक अकरा लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पाच लाख रुपये, तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये असेल. तर, महानगरपालिका स्तरावर प्रथम पारितोषिक 21 लाख रुपये द्वितीय पारितोषिक 15 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक अकरा लाख रुपये असेल. वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रासाठी देखील पारितोषिकांची रक्कम याचप्रमाणे राहील.

उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असेल. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक 11 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पाच लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये असेल. विभागस्तरीय प्रथम पारितोषिक 21 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 15 लाख रुपये तर तृतीय पारितोषिक 11 लाख रुपये असे असेल.

राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी प्रथम पारितोषिक 51 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 31 लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक 21 लाख रुपये असेल. पारितोषिकांची एकूण रक्कम 72 कोटी 22 लाख रुपये इतकी असेल.

शाळांना मागील वर्षीच्या टप्पा-एक किंवा टप्पा-दोनमध्ये प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा खालच्या (निम्न) क्रमांकासाठी शाळेचा यावर्षीच्या अभियानात पारितोषिकांसाठी विचार केला जाणार नाही. यावर्षीच्या अभियानातील मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविल्यास यावर्षीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यासच त्या क्रमांकास शाळा पात्र राहील.

मूल्यांकनामध्ये सर्वोत्तम कार्य असणाऱ्या राज्यातील विविध स्तरांवर बक्षीस पात्र शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीचा यथोचित सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल, असे या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा


dainik maval jahirat

Previous Post

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । MLA Shivajirao Kardile Passes Away

Next Post

इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा – विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Womens honor ceremony in Induri Attractive Paithani gift from Vighnahar Patsanstha

इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा - विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.