Dainik Maval News : मावळ तालुक्यात गत दोन दिवसांत विविध ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. यापावसामुळे काढणीस आलेले आणि काढून ठेवलेले भातपीक नुकसानग्रस्त झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने केली आहे. याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, ज्येष्ठ नेते शांताराम लष्करी, सरपंच शिवाजी करवंदे, भिकाजी भागवत, मारुती असवले, किसन गवारी, भास्कर पिचड, बुधाजी पिचड, सदाशिव निसाळ, माजी सरपंच मारुती खामककर, बळीराम भोईरकर आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मे महिन्यातील पावसामुळे भात पेरणी वेळेवर होऊ शकली नाही. शेतकऱ्यांनी रोपे गोळा करून काही प्रमाणात लागवड केली होती. मात्र, आता कापणीच्या टप्प्यावर असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिके जमिनीत कोसळली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाह आणि घेतलेल्या कर्जफेडीचे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई तसेच विमा भरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर
