Dainik Maval News : तडीपार राहण्याचे आदेश असतानाही पिंपरी-चिंचवड हद्दीत कोयता घेऊन वावरत असलेल्यया आरोपीस पोलिसांनी पाचाणे ( ता. मावळ ) येथून ताब्यात घेतले. हि कारवाई रविवारी ( दि. २ ) रोजी सायं. साडेचारच्या सुमारास मौजे पाचाणे ( ता. मावळ ) गावचे हद्दीत पाचाणे गावातील पायबा मंदिराजवळ करण्यात आली.
राकेश मधुकर रेणुसे ( वय ३५ वर्षे, रा. पाचाणे ता. मावळ ) असे आरोपीचे नाव असून आरोपी अटकेत आहे. शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२, ३७ (१) (३), १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप विश्वनाथ राठोड ( वय ३३ ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीस पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयीन तडीपार आदेशाअन्वये पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हददीतुन १ वर्षे कालावधी करीता तडीपार करण्याचे आदेश होते.
असे असतानाही त्याने महाराष्ट्र शासनाची अथवा पोलीस उप आयुक्त यांची कोणतीही परवानगी न घेता आयुक्तालय हद्दीत वावरताना आढळून आला तसेच त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या एक लोखंडी कोयता मिळुन आला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोहवा घाडगे हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी

