व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन

पावसामुळे बाधित झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत महाविकासआघाडी मावळ तालुका यांच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 29, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
compensation should be given to affected rice farmers in Maval Mahavikas Aghadi letter to Tehsildar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पावसामुळे बाधित झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत महाविकासआघाडी मावळ तालुका यांच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

मागील ४ ते ५ दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे भातशेती आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक देखील पावसामुळे काढता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मावळ तालुक्यात भात पीक हे बहुतांश शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख पीक आहे.

अवकाळी पावसामुळे भात पिकाच्या काढणीच्या कामाला खीळ बसली असून शेतकऱ्यांसमोर भात पिके कशी काढायची, याची चिंता आहे. हंगामाच्या सुरुवातीला पेरणी उशीरा झाली, तीही कमी प्रमाणात आली. आता जेवढी भातशेती केली होती त्यामध्ये काही भातांना अजून भात आले नाही, जे आले ते पावसामुळे पडले व पिके पाण्यात आहेत.

भाताचे पिके हातचे गेल्यामुळे अपोआपच पशुधनासाठी लागणारा चारा आणि तांदुळ हाती येणार नाही. शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक दिवस पाऊस पडत असल्याने मावळ मधील शेतकऱ्यांचे भात पिकांचे अतोनात नुकसाना झाले असून त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महाविकासआघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देत शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास पुढील ८ दिवसात मोठ्या स्वरूपात आंदोलन महाविकासआघाडीच्या काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उ.भा.ठा), मनसे, वंचित आघाडी पक्षाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर


Previous Post

मोठी बातमी ! इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी होणार – वाचा सविस्तर

Next Post

आघाडीत बिघाडी… महाविकासआघाडीत सामील झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ यांचे पक्षातून निलंबन !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
आघाडीत बिघाडी… महाविकासआघाडीत सामील झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ यांचे पक्षातून निलंबन !

आघाडीत बिघाडी... महाविकासआघाडीत सामील झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ यांचे पक्षातून निलंबन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.