Dainik Maval News : मावळ तालुक्यातील काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी हे अभ्यासू आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार म्हणून नागरिकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. सध्या गावभेट संवाद दौऱ्यातून ते काले-कुसगाव गटातील नागरिकांशी संवाद साधत आहे.
श्री. दळवी यांनी मंगळवारी काले – कुसगांव जिल्हा परिषद गटातील सावंतवाडी, प्रभाचीवाडी, काले या गावांना भेटी दिल्या आणि येथील काकडा आरती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी किसन गावडे, राम सखाराम दळवी, दशरथ दळवी, हिरामण नढे, सुरेश दळवी, विजय दळवी, रामचंद्र ठाकर, किसन मोहोळ आदी मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गावभेट दौऱ्यात काले-कुसगाव गटातील गेव्हंडे आणि आपटी या गावांनाही श्री. दळवी यांनी भेट दिली आणि येथील नागरिकांसोबत संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शंकर दशरथ शिळवणे, शंकर आबू शिळवणे, गणेश शेंडे, दत्ताभाऊ साबळे, बबन कोशिरे, विष्णू मोरे, दत्ता साठे, राम घरदाळे आदी मान्यवर गावातील ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते. एक अभ्यासू व्यक्तीमत्व, प्रामाणिक नेतृत्व आणि प्रभावी उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर दळवी यांच्या नावाला स्थानिकांनी आपली पसंती व्यक्त केली.
गावभेट संवाद दौऱ्यात मंगळवारी रात्री मळवंडी ठुले येथे काकडा आरती समारोप सोहळ्यानिमित्त हभप कृष्णा महाराज पडवळ यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनाला उपस्थित राहून श्री दळवी यांनी श्री विठ्ठल भक्तांसमवेत हरीभजनाचा आनंद घेतला. याप्रसंगी ग्रामस्थांतर्फे हभप पडवळ महाराजांचा सत्कार श्री दळवी यांनी केला. तसेच ग्रामस्थांनीही आपुलकीने श्री दळवी यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काले – कुसगाव जिल्हा परिषद गटातील एक प्रभावी उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या भागातील समस्यांची, प्रश्नांची जाण असणारा आणि ती सोडविण्याचे धोरण असणारा उमेदवार म्हणून श्री ज्ञानेश्वर दळवी यांच्या नावाला नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण


