Dainik Maval News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे. अशात भारतीय जनता पक्षानेही नियोजनबद्धरित्या या निवडणुकांना सामोरे जायची तयारी केलेली दिसत आहे. नुकत्याच राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या अन् यानंतर भाजपाने आपल्या निवडणुक प्रभारींची नावे जाहीर केली आहे.
स्थानिकच्या निवडणुकांसाठी भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी निवडणूक प्रमुखपदांची जबाबदारी जाहीर करण्यात आली असून पुणे उत्तर ( मावळ ) साठी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) जिल्हा निवडणूक प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपाने लोणावळा नगरपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना जबाबदारी दिली. तर भास्करराव म्हाळसकर आणि गणेश भेगडे यांना अनुक्रमे वडगाव मावळ नगरपंचायत आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.
मावळ तालुक्यात सध्या आमदार सुनील शेळके यांच्या रुपाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. परंतु भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला हा भाग पुन्हा निवडणुकांच्या माध्यमातून आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. मावळ भाजपाचे संख्याबळ वाढवण्यासाठी आणि सत्ता काबीज करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण


