व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, November 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काकडा आरती सोहळा निमित्त ग्रामस्थांची भेट आणि आपुलकीचा संवाद ; ज्ञानेश्वर दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची सर्वत्र चर्चा

मावळ तालुक्यातील काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील सर्वात प्रबळ उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 6, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Dnyaneshwar Dalvi is hotly debated as strongest candidate in Kale-Kusgaon Zilla Parishad group in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील सर्वात प्रबळ उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असुनही सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध असल्याने ज्ञानेश्वर दळवी यांचे काले-कुसगाव गटात पारडे जड समजले जात आहे. नुकतीच काकडा आरती सोहळ्यानिमित्त काले-कुसगाव गटातील बहुतांश गावांना भेटी देत श्री दळवी यांनी ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या या गावभेट दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा असुन प्रभावी उमेदवार म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे.

श्री. दळवी यांनी बुधवारी कुसगांववाडी येथे काकडा आरती व महापूजा निमित्त ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी हरिभजनात तल्लीन होत भजनात साथसंगत केली. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर कडू, गणेश धानिवले, कृष्णा घिसरे, संतोष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गायक हभप एकनाथ दळवी, नारायण कडू, भाऊ निपाणे, अशोक राऊत, वसंत शिळावणे, बाळू पाठारे, रामदास काळे, मृदंगमणी साईनाथ लायगुडे, काशिनाथ गाडे, बाळू निकम उपस्थित होते. मनोहर गाडे, अंकुश भोसले, चंदू खिलारी, भाऊ गोणते, शशिकांत येवले, अर्जुन कालेकर, विश्वनाथ कालेकर, बळीराम जाधव, बबनराव कालेकर हेही मान्यवर आणि महिला गायक सरस्वती ओझरकर, सुनिता साठे, सुनिता दळवी, साधना कडू, उज्वला कडू आदी माता भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनीच श्री. दळवी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सोबत असल्याचा विश्वास दिला.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच कुसगांववाडी येथील कै. दिनेश शंकर तळेकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट श्री. दळवी यांनी घेतली आणि कै. दिनेश यांची पत्नी रूपाली, त्यांची आई व भाऊ संदीप तळेकर यांना कठीणप्रसंगी त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. तसेच दुधीवरे येथे कै. साधू महादू साबळे यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून साबळे कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आणि कुटुंबाला आधार दिला.

  • भडवली येथे काकडा आरती समाप्ती निमित्त हभप संदीप महाराज लोहोर यांचे कीर्तन आयोजित केले होते. या कीर्तन सोहळ्याला श्री ज्ञानेश्वर दळवी यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित वारकरी भाविकांसोबत कीर्तन श्रवणाचा आनंद त्यांनी घेतला. याप्रसंगी हभप हिरामण घारे, भिकू लोहार, पोलीस पाटील संदीप आडकर, हभप रघुनाथ महाराज लोहोर, काशिनाथ लोहोर, रामचंद्र लोहोर यांनी ग्रामस्थांच्या वतीने श्री. दळवी यांचा सत्कार केला आणि त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

कोथुर्णे या आपल्या मुळ गावी काकडा आरती समाप्ती निमित्त हभप तुषार महाराज दळवी (भाजे) यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तन सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने हभप तुषार महाराज दळवी यांचा सत्कार श्री. ज्ञानेश्वर दळवी आणि हभप भास्करराव पाटील-तिडके, श्री वाघुजी दळवी, हभप ज्येष्ठ वारकरी दत्तू नथू दळवी यांनी केला.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज होत असताना काले-कुसगाव गटातील औंढे येथे श्री ज्ञानेश्वर दळवी यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी माजी सरपंच एकनाथराव शिर्के आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. यावेळी हभप मारुती ढोले, किसन गावडे, राजू शेख, लहू दळवी, संजय दळवी, लक्ष्मण लोयरे, ज्ञानेश्वर नारायण दळवी, नंदू छबन दळवी, किसन मोहोळ आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचायत समिती मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी हे काले – कुसगाव गटातील सर्वात प्रभावी उमेदवार असून अनुभव संपन्न, अभ्यासू, दूरदृष्टी असलेले नेतृत्व तसेच स्वच्छ चारित्र्य आणि प्रामाणिक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण 


dainik maval jahirat

Previous Post

मावळसाठी भाजपाकडून स्वतंत्र निवडणूक प्रभारी नियुक्त ; राजकारणातील ‘या’ पैलवानावर मावळची कुस्ती जिंकण्याची जबाबदारी

Next Post

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले लोहगडावर भव्य दीपोत्सव ! हजारो दिव्यांनी उजळले गडावरील शिवस्मारक । Lohgad Fort

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
grand festival of lights was held at Lohagad Fort on occasion of Tripurari Pournima

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले लोहगडावर भव्य दीपोत्सव ! हजारो दिव्यांनी उजळले गडावरील शिवस्मारक । Lohgad Fort

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Union Home and Cooperation Minister Amit Shah two-day visit to Pune National Heavy Engineering Company Talegaon Dabhade Maval

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय पुणे दौरा; मावळातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचे आज भूमिपूजन

November 15, 2026
Locals oppose supplying water from Thokalwadi Dam Maval to Pimpri-Chinchwad

‘ठोकळवाडी’चे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास स्थानिकांचा विरोध ; धरणग्रस्तांचा ऐतिहासिक संघर्ष, शेतीच्या पाणीहक्कासाठी सर्वपक्षीय एकजुटीचा निर्धार

November 14, 2026
discussions on development issues in Takve-Vadeshwar ZP Gat initiative by Zilla Parishad Pune

जनतेच्या दारात प्रशासन; टाकवे-वडेश्वर गटात विकासाच्या प्रश्नांवर थेट चर्चा, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा अभिनव उपक्रम

November 14, 2026
Kashinath Shelar elected unopposed Chairman and Vitthal Kedari as Vice-Chairman Waksai Society Maval

वाकसई विकास सोसायटीच्या चेअरमनपदी काशिनाथ शेलार, तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल केदारी यांची बिनविरोध निवड

November 13, 2026
Janjatiya Gaurav Seva Saptah organized to mark 151 birth anniversary of Bhagwan Birsa Munda

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन

November 12, 2026
Minister Pankaja Munde visits sugarcane cutters in Maval taluka MLA Sunil Shelke is present

मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी

November 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.