Dainik Maval News : मावळ तालुक्यातील काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील सर्वात प्रबळ उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असुनही सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध असल्याने ज्ञानेश्वर दळवी यांचे काले-कुसगाव गटात पारडे जड समजले जात आहे. नुकतीच काकडा आरती सोहळ्यानिमित्त काले-कुसगाव गटातील बहुतांश गावांना भेटी देत श्री दळवी यांनी ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या या गावभेट दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा असुन प्रभावी उमेदवार म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे.
श्री. दळवी यांनी बुधवारी कुसगांववाडी येथे काकडा आरती व महापूजा निमित्त ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी हरिभजनात तल्लीन होत भजनात साथसंगत केली. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर कडू, गणेश धानिवले, कृष्णा घिसरे, संतोष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गायक हभप एकनाथ दळवी, नारायण कडू, भाऊ निपाणे, अशोक राऊत, वसंत शिळावणे, बाळू पाठारे, रामदास काळे, मृदंगमणी साईनाथ लायगुडे, काशिनाथ गाडे, बाळू निकम उपस्थित होते. मनोहर गाडे, अंकुश भोसले, चंदू खिलारी, भाऊ गोणते, शशिकांत येवले, अर्जुन कालेकर, विश्वनाथ कालेकर, बळीराम जाधव, बबनराव कालेकर हेही मान्यवर आणि महिला गायक सरस्वती ओझरकर, सुनिता साठे, सुनिता दळवी, साधना कडू, उज्वला कडू आदी माता भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनीच श्री. दळवी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सोबत असल्याचा विश्वास दिला.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच कुसगांववाडी येथील कै. दिनेश शंकर तळेकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट श्री. दळवी यांनी घेतली आणि कै. दिनेश यांची पत्नी रूपाली, त्यांची आई व भाऊ संदीप तळेकर यांना कठीणप्रसंगी त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. तसेच दुधीवरे येथे कै. साधू महादू साबळे यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून साबळे कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आणि कुटुंबाला आधार दिला.
- भडवली येथे काकडा आरती समाप्ती निमित्त हभप संदीप महाराज लोहोर यांचे कीर्तन आयोजित केले होते. या कीर्तन सोहळ्याला श्री ज्ञानेश्वर दळवी यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित वारकरी भाविकांसोबत कीर्तन श्रवणाचा आनंद त्यांनी घेतला. याप्रसंगी हभप हिरामण घारे, भिकू लोहार, पोलीस पाटील संदीप आडकर, हभप रघुनाथ महाराज लोहोर, काशिनाथ लोहोर, रामचंद्र लोहोर यांनी ग्रामस्थांच्या वतीने श्री. दळवी यांचा सत्कार केला आणि त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
कोथुर्णे या आपल्या मुळ गावी काकडा आरती समाप्ती निमित्त हभप तुषार महाराज दळवी (भाजे) यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तन सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने हभप तुषार महाराज दळवी यांचा सत्कार श्री. ज्ञानेश्वर दळवी आणि हभप भास्करराव पाटील-तिडके, श्री वाघुजी दळवी, हभप ज्येष्ठ वारकरी दत्तू नथू दळवी यांनी केला.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज होत असताना काले-कुसगाव गटातील औंढे येथे श्री ज्ञानेश्वर दळवी यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी माजी सरपंच एकनाथराव शिर्के आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. यावेळी हभप मारुती ढोले, किसन गावडे, राजू शेख, लहू दळवी, संजय दळवी, लक्ष्मण लोयरे, ज्ञानेश्वर नारायण दळवी, नंदू छबन दळवी, किसन मोहोळ आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
पंचायत समिती मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी हे काले – कुसगाव गटातील सर्वात प्रभावी उमेदवार असून अनुभव संपन्न, अभ्यासू, दूरदृष्टी असलेले नेतृत्व तसेच स्वच्छ चारित्र्य आणि प्रामाणिक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

