Dainik Maval News : त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगल पर्वावर लोहगड शिवस्मारक हजारो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले होते. ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच’ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा भव्य दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवस्मारकावर आकर्षक फुलांची सजावट आणि सुंदर रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारला होता. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या सर्व शिवभक्तांनी शिवस्मारक परिसरात भव्य शिवसृष्टी साकारण्यासाठी शासन दरबारी तातडीने पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला.
या कार्यक्रमाला गणेश धानिवले, सरपंच सोनाली बैकर, राजू शेळके, रमेश बैकर, शंकर चिव्हे, महेंद्र बैकर, पोपट दिघे, सोमनाथ बैकर, अभिषेक बेकर, पंढरीनाथ विखार, बाळू ढाकोळ, काजल ढाकोळ, स्वाती मरगळे, स्नेहल बेकर, ज्योती धानिवले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, अनिकेत अंबेकर, सचिन निंबाळकर, अमोल गोरे, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, संदीप भालेकर, राहुल वाघमारे, आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
लोहगड विसापूर मंच रौप्य महोत्सवी वर्षात!
दुर्गसंवर्धनाचे आदर्श काम
‘लोहगड विसापूर विकास मंच’ हे चालू वर्षात (२०२५) रोप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या २५ वर्षांपासून मंचाने लोहगड-विसापूर किल्ल्यावर दुर्ग संवर्धनाचे अतुलनीय काम उभे केले आहे.
ऐतिहासिक कामगिरी
मंचाच्या पाठपुराव्यामुळेच लोहगडला भक्कम गणेश दरवाजा बसला. तसेच, मुख्य द्वाराला सागवानी दरवाजा बसवून लोहगड महाराष्ट्रातील पहिला असा किल्ला ठरला, जिथे हा ऐतिहासिक बदल करण्यात आला.मंचाच्या प्रयत्नांमुळे शिवकालीन प्रथेनुसार गडाचे दरवाजे दररोज संध्याकाळी बंद होऊ लागले, ज्यामुळे गडावरील अनुचित प्रकारांना कायमचा आळा बसला.
जागतिक वारसा नामांकन
मंचाच्या सक्रिय सहभागाने लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या यांची कामे पुरातत्व विभागाने पूर्ण केली. विशेष म्हणजे, याच संघटित प्रयत्नांमुळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडला नामांकन मिळाले आहे.
मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी या निमित्ताने माहिती दिली की, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त (२०२५) वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

