Dainik Maval News : राज्यात लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील. मावळ तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद गटांत इच्छुक उमेदवारांचे प्रचार सुरू झाले असून यातही काले – कुसगांव जिल्हा परिषद गट प्रचंड चर्चेत आहे. याच गटातील एका उमेदवाराची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे, तो उमेदवार म्हणजे मावळ पंचायत समितीचे माजी सभापती श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी.
भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच पवन मावळ विभागातील जुणे – जाणते, प्रामाणिक नेतृत्व असलेले श्री. दळवी हे काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढविण्याची तयारी करीत आहेत. त्यांच्या उमेदवारीबद्दल काले-कुसगाव गटात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर दळवी यांचा सध्या गावभेट संवाद दौरा सुरू असून यामध्ये ग्रामस्थांच्या बैठका घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, प्रदेशाच्या विकासाचे धोरण ठरणे यासोबतच जनसंपर्काची मोठी नाळ ते जोडत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे.
जवण (क्रमांक १) :
जवण येथे काकडा आरती सोहळ्याच्या समाप्ती निमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनाला श्री. दळवी यांवी हजेरी लावली. हभप बाळकृष्ण महाराज कोंडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे श्रवण केले. याप्रसंगी भाऊसाहेब गुंड, दशरथ शिर्के, बाळासाहेब तुपे, स्वप्नील तुपे, पांडुरंग शिर्के आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाकुरसाई :
ठाकुरसाई येथे गावभेट संवाद दौऱ्यात श्री. दळवी यांनी ग्रामस्थांची आपुलकीने भेट घेतली. ठाकुरसाई ग्रामस्थांनीही दळवी यांचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी काले गण अध्यक्ष अनंता वर्वे, ठाकुरसाईचे सरपंच तथा कृती समितीचे अध्यक्ष नारायण बोडके, शांताराम ठाकर, प्रकाश ठाकर, रामचंद्र ठाकर, लक्ष्मण ठाकर आदी मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी काले-कुसगाव गटातून श्री. दळवी यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
बेडसे :
बेडसे येथील गावभेट दौऱ्यात श्री. दळवी यांचे ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात स्वागत केले. यावेळी मा. चेअरमन बबनराव दहिभाते, चंद्रकांत दहिभाते आणि इतर उपस्थित ग्रामस्थांसोबत बैठक घेत दळवी यांनी विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी ग्रामस्थांनी दळवी यांच्या उमेदवारीला सकारात्मक पाठींबा दर्शविला.
थुगाव :
थुगाव येथे काकडा आरती सोहळा समाप्ती निमित्त आयोजित हरीजागर व कीर्तन सोहळ्याला श्री ज्ञानेश्वर दळवी यांनी उपस्थिती दाखविली. याप्रसंगी हभप बाळासाहेब महाराज शेवाळे, नावजी सावंत, बारकू सावंत, किसन तरस, भाऊ सावंत, नामदेव पोठफोडे, बाळासाहेब वाघोले यांनी ग्रामस्थांच्या वतीने श्री. दळवी यांचा सन्मान केला. तसेच काले – कुसगाव गटातील प्रभावी उमेदवार म्हणून त्यांना जिल्हा परिषदेत पाठविण्याचा मानस बोलून दाखविला.
गावभेट दौऱ्यादरम्यान ज्ञानेश्वर दळवी यांनी आर्डव येथे माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी वरघडे कुटुंबीयांना श्री. दळवी यांचे उत्साहात स्वागत केले, तसेच त्यांचे औक्षण करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ( Dnyaneshwar Dalvi village visit tour Discussion on Dalvi candidacy in Kale-Kusgaon Zilla Parishad group )
तुपे कुटुंबीयांचे सांत्वन :
कडधे येथे काही दिवसांपूर्वी कै. मधुकर तुपे यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांची ज्ञानेश्वर दळवी यांनी सांत्वनपर भेट घेतली. याप्रसंगी कै. मधुकर तुपे यांचे चिरंजीव आत्माराम तुपे आणि कुटुंबाला श्री. दळवी यांनी धीर देऊन सोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी किसनराव मोहोळ, लक्ष्मण दळवी, राम सखाराम दळवी, संजय ठाकर, मनोहर तुपे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
– रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर
– ठरलं तर ! वडगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार ; १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार
