व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर

सन २०२५-२६ मधील रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभाग नोंदणीसाठी https://www.pmfby.gov.in हे राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 8, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
peek-vima-yojana

File Image


Dainik Maval News : सन २०२५-२६ मधील रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभाग नोंदणीसाठी https://www.pmfby.gov.in हे राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरु करण्यात आले आहे. ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भुईमूगासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या मुदतीत पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून विभागातील पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी- फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार आदी कागदपत्रे आवश्यक असून ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे.

विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी विभागास केंद्र शासनाने निर्धारित केलेले प्रति शेतकरी ४० रुपये मानधन संबंधित विमा कंपनीमार्फत दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करुन विमा योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना पुढील पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.

जिल्हा व पीक निहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (कंसात) पुढीलप्रमाणे;
अहिल्यानगर जिल्हा – गहू (बागायत)- विमा संरक्षित रक्कम ४५ हजार रूपये (विमा हप्ता ४५० रुपये), रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा- ३६ हजार रुपये (३६० रुपये),
पुणे जिल्हा – गहू (बागायत)- ४५ हजार रूपये (२२५ रुपये), रब्बी ज्वारी बागायत व जिरायत- ३६ हजार रुपये (१८० रुपये), हरभरा- ३६ हजार रुपये (९० रुपये) याप्रमाणे विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता राहील.
सोलापूर जिल्हा – गहू (बागायत)- विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रूपये (विमा हप्ता ३८० रुपये), रब्बी ज्वारी बागायत – ३६ हजार रुपये (३६० रुपये), रब्बी ज्वारी जिरायत- ३० हजार रुपये (३०० रुपये), हरभरा- ३२ हजार ६७५ रुपये (३२६ रुपये ७५ पैसे) याप्रमाणे राहील.

रब्बी कांद्यासाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम ९० हजार रुपये तर विमा हप्ता अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यासाठी ९०० रुपये आणि सोलापूर जिल्ह्यासाठी ४५० रुपये राहील. उन्हाळी भुईमूगासाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम ४० हजार ६०० व विमा हप्ता १०१ रुपये ५० पैसे विमा हप्ता राहील.

अधिक माहितीसाठी १४४४७ या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा भारतीय कृषी विमा कंपनी, स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा https://krishi.maharashtra.gov.in या संकेस्थळाला भेट द्यावी. शेतकऱ्यांनी विहित मुदतीमध्ये योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन गावसाने यांनी केले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण 


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन । Lok Adalat Pune District

Next Post

वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Election All political parties should strictly follow the code of conduct

वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा - सहा. निवडणूक निर्णय अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.