Dainik Maval News : वडगाव मावळ येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज जन्मोत्सवानिमित्त दिनांक ६ ते १३ नोव्हेंबर दरम्यान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जीवन चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच सप्ताह काळात दररोज पहाटे ५ ते ६ या वेळात मानकऱ्यांच्या हस्ते ‘श्रीं’चा अभिषेक व महापूजा, तसेच सायंकाळी ६.३० ते ९ या वेळात मंदिराच्या प्रांगणात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा संपन्न होणार आहे.
हभप डॉ. सुदाममहाराज पानेगावकर हे कथा सादर करणार आहेत. या काळात संत तुकाराम महाराजांचा अवतार जन्म, बालपण, कौटुंबिक सहवास, विवाह सोहळा, श्रीक्षेत्र भामचंद्र भंडारा, घोरावडेश्वर डोंगर येथील साधना, पंढरीची वारी श्री विठ्ठलाचे दर्शन आदी विविध प्रसंगावर कथा सांगणार आहेत.
दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १२ या वेळात श्री कालभैरवनाथ देव जन्माचे कीर्तन होणार असून, त्यानंतर श्री पोटोबा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळात हभप तुषार महाराज दळवी यांचे काल्याचे कीर्तन व काल्याच्या महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, तुकाराम काटे, अशोक ढमाले,अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे,सुभाष जाधव, भास्करराव म्हाळसकर, सुनीता कुडे, लेखनिक संभाजी येवले यांनी सोहळ्याचे संयोजन केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
– रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर
– ठरलं तर ! वडगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार ; १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार
