Dainik Maval News : मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती बुधवारी ( दि. 12 ) तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांनी दिली.
मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे उपस्थित होते. तिघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर तळेगाव आणि लोणावळा या दोन नगरपालिकांबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला, असे शेळके यांनी सांगितले.
या करारानुसार लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर तळेगाव दाभाडे नगर परिषद भाजपाकडे राहणार आहे. या वाटपामुळे मावळातील दोन्ही प्रमुख पक्षांमधील मतभेद संपुष्टात येऊन विकासाच्या दिशा ठरविण्यासाठी एकत्रितपणे काम होईल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.
तळेगाव दाभाडे नगरपालिकेत १४ प्रभागांमधून २८ नगरसेवकांची निवड होणार आहे. प्राथमिक चर्चेनुसार, नगराध्यक्षपदाच्या पहिल्या अडीच वर्षांसाठी भाजपाचे संतोष दाभाडे पाटील, तर पुढील अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीचे गणेश काकडे यांना संधी मिळेल, अशी माहिती दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident


