Dainik Maval News : मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्रित निवडणूक लढावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी प्रयत्न केले. बुधवारी सकाळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत तळेगाव आणि लोणावळा बद्दलची माहिती दिली. परंतु या पत्रकार परिषदेच्या अवघ्या 6 तासांत लोणावळा शहरात महायुतीत बिघाडी झाल्याचे समोर आले.
लोणावळा शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक भाजपा स्वतंत्र लढविणार असल्याचे सांगत लोणावळ्यातील जनता आणि आम्ही सक्षम असल्याचे सांगतले व पुढे बोलताना, आमदारांनी कुठल्याही अफवा सोडू नयेत, असे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.
सुरेखा जाधव म्हणाल्या, “लोणावळ्याचा निर्णय लोणावळ्यातच होणार, बाहेरून कोणी सांगणार नाही. आम्ही जनतेशी जोडलेले आहोत आणि जनताच आमचा निर्णय घेईल.” त्याचबरोबर त्यांनी सूचकपणे नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला खेळ थांबवला पाहिजे.”
दरम्यान भाजपाच्या या पत्रकार परिषदेनंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद आपली भूमिका स्पष्ट केली. युतीबाबत स्वतः बाळा भेगडे यांनी पुढे येऊन सर्व स्पष्ट करावे. आमचा आमचे नेते, आमदार सुनील शेळके यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आमचीही स्वबळाची तयारी आहे, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.
त्यानंतर सायंकाळी भाजपाने लोणावळा शहर निवडणुकीसाठी आपला प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बाळा भेगडे यांनी स्पष्टपणे बोलत, लोणावळा शहरात युतीला पुर्णविराम मिळाला असल्याचे सांगितले. एकंदरीत लोणावळ्यात युतीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident


