Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाने संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत गणपती बाप्पांचे आर्शिवाद घेत 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
लोणावळा शहरामध्ये भाजपा पक्षाकडे 27 प्रभागांसाठी व नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार असून पुढील दोन दिवसात उर्वरित उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा पक्षाकडून केली जाईल, अशी माहिती लोणावळा शहर निवडणूक प्रभारी, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी दिली.
भाजपाचे जाहीर झालेले 11 उमेदवार :
प्रभाग क्रमांक 01 : सुधीर गणपत पारिटे व शुभांगी सचिन गोसावी
प्रभाग क्रमांक 05 : सुभाष सुमंत डेनकर व ब्रिंदा अनिश गणात्रा
प्रभाग क्रमांक 06 : दत्तात्रेय रामचंद्र येवले व रेश्मा अर्जुन पठारे
प्रभाग क्रमांक 07 : देविदास भाऊसाहेब कडू व सुरेखाताई नंदकुमार जाधव
प्रभाग क्रमांक 11 : रचना विजय सिनकर
प्रभाग क्रमांक 12 : अभय अशोक पारख व विजयाताई नारायण वाळंज
यावेळी भारतीय जनता पक्षाचे लोणावळा व नाने मावळ अध्यक्ष अनिल गायकवाड, कोर कमिटीचे सदस्य रामविलास खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, राजाभाऊ खळदकर, विजय उर्फ पोपट मोरे, अरविंद कुलकर्णी, संतोष गुप्ता, महिला अध्यक्ष परिचय भिलारे, बाळासाहेब जाधव, अरुण लाड, हर्षल होगले, अर्जुन पाठारे, पार्वती भाभी रावळ, सुरेश गायकवाड, मांगीलाल जैन यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident

