Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025
राज्य निवडणुक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर रोजी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2025 कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरिता नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
दरम्यान गुरुवार, दिनांक १३/११/२०२५ रोजीपर्यंत वडगाव नगरपंचायत, वडगाव येथे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरिता एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही.
प्रशासनाकडून मतदार जनदागृती उपक्रम :
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नगरपंचायतच्या वतीने शहरातील गर्दीचे ठिकाणे महाविद्यालय येथे मतदानाचे महत्त्व पटवून मतदार प्रतिज्ञा घेऊन मतदार जनजागृती उपक्रम (SVEEP) राबविण्यात आला. लोकशाहीत मतदार हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे ही आपली कर्तव्यभावनेची जबाबदारी आहे.
“माझा मत, माझा हक्क – प्रत्येक मतदार, देशाचा बळकटीदार!” या घोषवाक्याखाली मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान करून लोकशाही मजबूत करावी. सर्व नागरिकांनी मतदानाच्या दिवशी आपला मतदार ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे आणि आपला एक मत लोकशाहीत परिवर्तन घडवू शकतो,असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी शहरातील सर्व मतदारांना केले आहे.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन श्रीमती मनिषा तेलभाते, निवडणूक निर्णय अधिकारी व डॉ. प्रविण निकम,सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident

