Dainik Maval News : आमणे–लोनाड परिसर वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय रंगाने अक्षरशः दुमदुमला. पायी पालखी सोहळा २०२५ चे पर्व ४ थे भक्तीसात्विक उत्साहात, भावविभोर वातावरणात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडले. सालाबादप्रमाणे यंदाही परंपरेचे पालन करत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कीर्तन सोहळ्याला नागरिकांनी उसळत्या गर्दीचा अभूतपूर्व प्रतिसाद दिला. प्रशांत पेट्रोलियम शेजारी, इंदोरी बायपास येथे उभारलेल्या विशाल जर्मन-अँगल मांडवात सायं. ६ ते ९ या वेळेत झालेल्या कार्यक्रमात भक्तिरसाचा महासागर उसळला.
कार्यक्रमात ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर यांच्या प्रभावी कीर्तनाने वातावरण भारावून गेले; वारकरी गंधर्व ह.भ.प. ओंकार महाराज जगताप (आलंदी) यांच्या स्वराभिनयाने भाविक तल्लीन झाले; भजन सम्राट ह.भ.प. कैलास महाराज पवार (जालना) यांच्या भक्तिरंगाने सोहळा उजळून निघाला; तर गायिका शिवानी ताई शिंदे यांच्या सुरेल आवाजाने सभोवताल भक्तिभावाने न्हाऊन निघाला. मृदंगम महामेरू कृष्ण महाराज भोरकडे यांच्या दमदार तालावर दिंडी भक्तिभावाने थिरकली.
राहण्याची, भोजनाची, पाण्याची आणि स्वच्छतेची व्यवस्था अत्यंत नीटनेटकी करण्यात आली होती. त्यामुळे वारकऱ्यांनी आयोजकांबद्दल समाधान व्यक्त केले. दिंडीच्या स्वागतावेळी परिसरातील नागरिक, महिला-भगिनी, तरुण-तरुणी आणि वयोवृद्ध भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अत्तरपर्वणीप्रमाणे वातावरण उजळून टाकले.
या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी आमदार सुनील शेळके हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर मेघाताई भागवत यांची प्रभावी उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रमुख उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असताना वारकरी संप्रदायाने दिलेला प्रेमळ आशीर्वाद हा त्यांच्या सामाजिक स्वीकाराचा दृढ पुरावा ठरला. मेघाताईंचा शांत, संतसदृश, सर्वसमावेशक आणि लोकांशी आत्मीयता जपणारा स्वभाव वारकऱ्यांच्या मनात आदराचे स्थान अधिक गडद करणारा ठरला.
कार्यक्रमामध्ये प्रशांत दादा भागवत यांची उपस्थिती आणि कार्यतत्परता विशेष उल्लेखनीय ठरली. धार्मिक कार्यातील त्यांची निष्ठा, वारकरी परंपरेप्रती असलेला आदर आणि समाजसेवेतील सातत्य—या सर्वामुळे सोहळ्याच्या यशात त्यांचा मोठा वाटा राहिला. दिंडी सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे भाविकांना विशेष दिलासा मिळाला.
यावेळी सरपंच शशिकांत शिंदे, माजी उपसरपंच संदीप ढोरे, विठ्ठल मोहिते, अनिल मोहिते, भरत मांडेकर, नंदकुमार शेलार, एड. रवींद्र पेटकर, भंडारा डोंगर विश्वस्त किसनराव कराळे, बळीराम मराठे, भरत घोजगे, बाळासाहेब घोजगे, प्रकाश घोजगे, भानुदास दरेकर पाटील, ललिता कोतुळकर, बाळासाहेब गोजगे, माधुरी जाधव, समीर जाधव यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडी मुक्कामी असल्याने जर्मन अँगल मांडव, सुसज्ज टॉयलेट-बाथरूम सुविधा, पिण्याच्या पाण्याची शिस्तबद्ध व्यवस्था यांची प्रशंसनीय तयारी करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, आशिष ढोरे, मनोहर भेगडे, बबनराव ढोरे, दामोदर शिंदे, अरविंद भाऊ शेवकर, जयश्री सावंत यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. दिंडीचे फुलांनी व फटाक्यांच्या आतषबाजीसह शानदार स्वागत प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने करण्यात आले.
भक्ती, सेवा, व्यवस्थापन आणि जनसहभाग यांची सांगड घालत आमणे–लोनाड परिसरातील पालखी सोहळा २०२५ चे पर्व ४ थे हे वर्णनातीत यशस्वी ठरले. मेघाताई भागवत आणि प्रशांत दादा भागवत यांच्या प्रभावी सहभागामुळे हा कार्यक्रम या प्रदेशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident
