Dainik Maval News : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्यावतीने माहे नोव्हेंबर २०२५ महिन्यात विविध तालुक्यांमध्ये पक्क्या अनुज्ञप्ती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित तालुक्यानुसार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार, खेड ३ व ४ नोव्हेंबर २०२५, मंचर १०, ११ व १२ नोव्हेंबर, जुन्नर १७, १८ व १९ नोव्हेंबर, वडगाव मावळ २४ व २५ नोव्हेंबर, लोणावळा २७ व २८ नोव्हेंबर २०२५ रोजी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा –
शिकाऊ अनुज्ञप्ती काढून 30 दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.
आवश्यक कागदपत्रे –
– नमुना 4 (Form 4)
– शिकाऊ अनुज्ञप्ती
– नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
– वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम 4 नुसार पुरावा.
– परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना ५ मधील प्रमाण्पत्र.
– शुल्क
– ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.
चाचणी परिक्षा –
वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो. ( Pimpri Chinchwad RTO Monthly Visit Time Table November 2025 Read in Details )

