Dainik Maval News : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तसेच इच्छुक उमेदवार देखील आपापल्या परीने तयारी करीत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मावळ तालुक्यात काले – कुसगांव जिल्हा परिषद गट हा एकमेव गट खुला प्रवर्गासाठी असल्याने याठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळू शकते. यापार्श्वभूमीवर नुकतीच भारतीय जनता पार्टी पक्षाची काले गणातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत पक्षाच्या काले गणातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवार, पक्ष संघटन यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी काले गणातून पंचायत समिती आणि काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार यांच्या बद्दलही चर्चा करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे जुणे – जाणते नेतृत्व तसेच मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी यांच्या नावाची चर्चा करण्यात आली.
ज्ञानेश्वर दळवी हे काले – कुसगांव जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून आणि काले – कुसगांव गटातील सर्वाधिक प्रभावी संभाव्य उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर दळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. नुकताच ज्ञानेश्वर दळवी यांनी काले – कुसगांव जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये गावभेट संवाद दौरा केला होता. त्यांच्या या संवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. सोबतच, भाजपा पक्षाकडूनही एक प्रभावी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
