Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात २६ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाईचा तपशील असा ;
दोन वर्षांसाठी तडीपार – राहुलसिंग ऊर्फ कद्दा रमेशसिंग टाक (रा. भारतनगर, भोसरी), रोहित ऊर्फ नन्या राजेश मिश्रा (रा. नेहरूनगर, पिंपरी), पवन सचिन ससाणे (रा. गांधीनगर, पिंपरी), स्वप्नील अरुण लांडे (रा. सोमाटणे फाटा, शिंदे वस्ती, मावळ), जय ऊर्फ कीटक प्रवीण भालेराव (रा. सिद्धार्थ नगर, तळेगाव स्टेशन), निखिल दत्तात्रय पोकळे (रा. चौराईनगर सोमाटणे), विशाल ऊर्फ साकी संजय गायकवाड (रा. वाकड), नीलेश शंकर वाघमारे (रा. वाकड गावठाण), मनोज ऊर्फ नाना शंकर दूनघव (रा. शांतिनगर, भोसरी), सचिन दीपक लोखंडे (रा. लक्ष्मीरोड चिखली).
एका वर्षासाठी तडीपार – अमित गजानन वानरे, विशाल बाळू वाजे, प्रेमगोरक्ष साकोरे (तिघेही रा. किवळे), राकेश मधुकर रेणुसे (रा. पाचाणे, मावळ), सिद्धार्थ नागनाथ थोरात (रा. निळकंठनगर, तळेगाव दाभाडे), संदीप रमेश सूर्यवंशी (रा. शिरगाव), रीना गोविंद नट (रा. च-होली फाटा, चहोली) व नवनाथ बाळू धोंगडे (रा. दत्त मंदिर, चाकण).
सहा महिन्यांसाठी तडीपार – ऋषिकेश दादाभाऊ बोरुडे (रा. ज्योतिबा नगर, काळेवाड़ी), ज्योती गोरख राठोड (रा. आंबी, मावळ), करिष्मा निर्मल राठोड (रा. चांदखेड, मावळ), रविना विश्वास राठोड (दोघेही रा. चांदखेड, मावळ), माला अनिल गुंजाळ (रा. म्हातोबानगर, वाकड), राजतिलक धर्मा राठोड (रा. पांडवनगर, हिंजवडी), लच्छाराम पुनाराम देवासी (रा. फेज ३ माण), अंचिता अनिरुद्ध रॉय (रा. सुसगाव).
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका


