Dainik Maval News : कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटातील खडकाळा गणात सौ. आशाताई बाबुराव (आप्पा) वायकर यांच्या माध्यमातून खास महिला भगिनींकरिता ‘होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडकाळा गणातील सर्वच गावांतील महिला भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मनोरंजनासह बक्षीसे जिंकण्याची संधी यामुळे महिला भगिनींमध्ये चैतन्याचे वातावरण होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व तालुक्यातील अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
कामशेतमधील श्री विठ्ठल परिवार मैदान येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या इच्छुक अन् प्रभावी उमेदवार सौ. आशाताई बाबुराव वायकर यांच्या माध्यामातून यापूर्वीही महिलांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तेव्हाही महिलांची मोठी उपस्थिती लाभली होती. तसाच प्रतिसाद कामशेत येथेही पाहायला मिळाला. चारचाकी, दुचाकी, लहान मोठी अनेक बक्षीसे आणि सहभागी महिलेस खास गिफ्ट यामुळे माता भगिनी अत्यानंदीत होत्या.
भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुक्यातील प्रमुख नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, भास्करआप्पा म्हाळकर, गुलाबराव म्हाळसकर, बाळासाहेब नेवाळे, निवृत्ती शेटे, अविनाश बवरे यांसह खडकाळा गणातील अनेक आजी – माजी सरपंच, चेअरमन, व्हाईसचेअरमन, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी अन् माता भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचंड उत्साह, जल्लोषपूर्ण वातावरण, विविध खेळ, आकर्षक बक्षीसे आणि निखळ मनोरंजन यामुळे हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला आणि संस्मरणीय ठरला. दररोजच्या घरकाम, धावपळ, जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन महिलाभगिनींनी स्वतःसाठी घालवलेला हा क्षण अनुभवताना माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद भारावून टाकणारा होता.
आशाताई वायकर यांना भरभरून आशीर्वाद
कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज भाजपाच्या आशाताई वायकर यांना महिला भगिनींनी भरभरून आशीर्वाद दिले. आशाताई बाबुराव (आप्पा) वायकर यांना आगामी निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वांचा पाठींबा राहिल, असा विश्वास उपस्थित माता भगिनींनी बोलून दाखविला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
