Dainik Maval News : महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या तीन टप्प्यांपैकी दुसरा टप्पा मावळ तालुक्यात परिज्ञानाश्रम शाळा, कार्ला फाटा येथे १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यशाळेत तालुक्यातील एकूण ३७८ शिक्षक-प्रशिक्षणार्थींनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, विस्तार अधिकारी संदीप काळे, सुदाम वाळुंज, निर्मला काळे, शांतीलाल मुथा फाउंडेशनचे निरीक्षक मीनल दशपुत्रे, जिल्हा समन्वयक तेजश्री पाटील, तालुका समन्वयक मच्छिंद्र आघाव यांनी भेट देऊन पाहणी केली व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण सुलभक म्हणून मल्लिकार्जुन कांबळे, रूपाली शिंदे, यशवंत काळे, मोनिका पोटे, अशोक गपाट, रमेश गायकवाड, रामेश्वर पवार, उषा तट्टू, तानाजी भोसले, सुमन परीट, प्रकाश सातपुते व गंगासेन वाघमारे यांनी कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.
प्रशिक्षण समन्वयक विषय साधन व्यक्ती सविता पाटील, केंद्रप्रमुख संतोष पवार, गंगाराम केदार, सुहास धस यांनी संपूर्ण कार्यशाळा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या प्रशिक्षण टप्प्यात मूल्यसंवर्धनासाठी प्रभावी अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक मूल्यांची रुजवणूक आणि शाळास्तरावरील उपक्रमांची अंमलबजावणी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ३७८ शिक्षकांनी सहभाग नोंदविल्याने तालुक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाची उभारणी अधिक बळकट होण्यास मदत होईल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
