व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाकडून ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास

मुंबईच्या किनारपट्टीची सुरक्षा असो किंवा शहरातील सीसीटीव्ही नेटवर्कचे जाळे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात या कामांना गती मिळाल्याचे दिसते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 13, 2026
in महाराष्ट्र, देश-विदेश
BJP new chapter of Fear-Free Mumbai Home Minister Devendra Fadnavis Zero Tolerance policy

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे शहर कधीही थांबत नाही, असे म्हटले जाते. परंतु याच मुंबई शहराने गेल्या काही दशकांत अनेकदा रक्ताचे सडे आणि बॉम्बस्फोटांचा थरार अनुभवला. एकेकाळी दहशतीच्या छायेत जगणाऱ्या मुंबईकरांसाठी आज ‘सुरक्षा’ हा केवळ शब्द उरलेला नसून ती एक वस्तुस्थिती बनली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये स्वतः फडणवीस गृहमंत्रीपदी आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या ‘राष्ट्रप्रथम’ धोरणानुसार आणि ‘दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता’ हे धोरण राबवून मुंबईला भयमुक्त करण्याचे ठरविले. आज या धोरणामुळे मुंबई शहराचा ‘भयमुक्त मुंबई’ हा नवा अध्याय आकारास येत आहे.

…जेव्हा मुंबई भीतीच्या सावटाखाली होती
2014 पूर्वीच्या मुंबईची स्थिती पाहिली तर एक विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोट असोत, झव्हेरी बाजारचा परिसर असो किंवा 26/11 चा भीषण दहशतवादी हल्ला; मुंबई सतत कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर होती. त्यावेळच्या राज्य आणि केंद्र सरकारांच्या ‘मवाळ’ धोरणांमुळे दहशतवादी घटकांचे मनोबल वाढले होते, असा आरोप सातत्याने केला जातो. वारंवार होणारे स्फोट आणि गुप्तचर यंत्रणांचे अपयश यामुळे मुंबईची सुरक्षा रामभरोसे होती. मात्र, 2014 नंतर चित्र बदलण्यास सुरुवात झाली.

भाजपाची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी
भाजपा सरकारने सत्तेवर येताच राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. मुंबईच्या किनारपट्टीची सुरक्षा असो किंवा शहरातील सीसीटीव्ही नेटवर्कचे जाळे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात या कामांना गती मिळाल्याचे दिसते.

हेही वाचा – मुंबईच्या विकासाचा वारू कोण रोखू पाहतंय ? देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि ‘स्वप्ननगरी’ विकासाच्या रुळावर

घुसखोरीवर प्रहार
मुंबईच्या सुरक्षेला केवळ बाहेरूनच नाही, तर आतूनही धोका निर्माण झाला होता. अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहराच्या लोकसंख्येचा समतोल बिघडण्यासोबतच गुन्हेगारी आणि कट्टरतावादाला खतपाणी मिळत होते. या अवैध घुसखोरोविरुद्ध तत्कालीन भाजपा सरकारने विशेष मोहीम उघडून त्यांना बाहेर काढण्याचे धाडस दाखवले.

विवाद आणि न्यायालयीन लढाई
‘हजरत मोहम्मद अफजल खान मेमोरियल सोसायटी’ने कबरीभोवती अनधिकृत बांधकाम करून वनविभागाच्या जागेचा मोठा विस्तार केला होता. हिंदू संघटनांनी याविरोधात अनेक वर्षे लढा दिला. २००४ मध्ये जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आणि ‘व्होट बँक’ गमावण्याच्या भीतीमुळे प्रशासन कारवाई करण्यास धजावत नव्हते.

दरम्यान, राज्यात सत्तापालट झाल्यानंतर महायुती सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले. १० नोव्हेंबर २०२२ च्या पहाटे कडक पोलीस बंदोबस्तात आणि कलम १४४ लागू करून कबरीभोवतीचे अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. न्यायालयीन आदेशाचे पालन करत भाजपाने हे सिद्ध केले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही.

हेही वाचा – मराठी अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर ? ठाकरेंची मुंबई महापालिकेतील सत्तेची २५ वर्षे आणि मराठीचा टक्का

दंगलखोरांना कडक इशारा
नजीकच्या काळात मीरा-भाईंदरमध्ये झालेली जातीय दंगल असो किंवा माहिमच्या समुद्रातील अनधिकृत ‘मजार’चा मुद्दा, भाजपा सरकारने कठोर भूमिका घेतली. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी मीरा-भाईंदर परिसरात उसळलेल्या दंगलीतील आरोपींच्या अवैध बांधकामांवर प्रशासनाने ‘बुलडोझर’ फिरवला. तर, माहिमच्या समुद्रात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या मजारवर भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने तत्काळ पावले उचलली आणि ते अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.

महाविकास आघाडीवर टीकेची झोड
या संपूर्ण प्रक्रियेत भाजपचा मुख्य रोख महाविकास आघाडीवर आहे. भाजपच्या मते, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (UBT) हे पक्ष विशिष्ट समुदायाची मतपेढी जपण्यासाठी कट्टरपंथीयांकडे डोळेझाक करतात. भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा जेव्हा सुरक्षा यंत्रणा अवैध घुसखोरांवर कारवाई करतात, तेव्हा मविआचे नेते मानवाधिकाराचा डंका वाजवत त्यांच्या बचावासाठी पुढे येतात. हे ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ मुंबईला पुन्हा एकदा २० वर्षांपूर्वीच्या स्फोटांच्या मालिकेकडे नेऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सुरक्षित मुंबई आणि स्थिर मुंबई
आज मुंबईत सण-उत्सव शांततेत पार पडतात. दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या आल्या तरी यंत्रणा आता अधिक सतर्क आहेत. ‘नया भारत’ आणि ‘मजबूत भाजप’ मुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला सीमेवरच रोखले जात आहे, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम मुंबईच्या सुरक्षिततेवर झाला आहे. भाजपा सरकारचे खासकरून फडणवीस यांचे धोरण स्पष्ट आहे की, “गुन्हेगाराला धर्म नसतो, पण गुन्हेगारीला थारा देणे हा राष्ट्रद्रोह आहे.” याच धोरणामुळे आज मुंबईकरांसाठी ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय लिहिला जात आहे. भाजपाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाने मुंबईला एक नवे सुरक्षा कवच दिले आहे.

अधिक वाचा –
– मुंबई महापालिका निवडणुकीत ‘डिजिटल’ रणसंग्राम : ‘मार्व्हल’ स्टाईल कॅम्पेनद्वारे भाजपाची प्रचारात आघाडी
– मायानगरीचा महाकायापालट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन’ आणि मुंबईत पायाभूत सुविधांचे नवे युग
– मराठी अस्मिता विरुद्ध परकीय घुसखोरी : निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईच्या जनसांख्यिकीय बदलाचा मुद्दा केंद्रस्थानी


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होणार, निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद

Next Post

नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव-कातवी मधील ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Caste certificates distributed to 13 families of Thakar community in Vadgaon-Katvi through Mayor Aboli Dhore

नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव-कातवी मधील ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.