Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाने आपले नगरसेवक पदाचे खाते खोलले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी भांगरवाडी प्रभाग क्रमांक सात मधील भाजपाचे नगरसेवक देविदास भाऊसाहेब कडू यांच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नूतन विवेक घाणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे देविदास कडू हे बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. आता केवळ त्यांच्या औपचारिक निवडीची घोषणा बाकी आहे.
देविदास कडू यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार न देण्याचे आमदार सुनील शेळके यांनी जाहीर केले होते. तसेच अन्य पक्षांकडेही सक्षम उमेदवार नसल्याने कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. नूतन घाणेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे देविदास कडू हे प्रभाग क्रमांक सात मधून बिनविरोध नगरसेवक झाले आहेत.
लोणावळा नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये भांगरवाडी प्रभागातून आजपर्यंत कोणीही बिनविरोध झालेले नाही. देविदास कडू यांनी हा इतिहास रचला असून या भागातून प्रथमच बिनविरोध होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला आहे.
“लोणावळ्यातील जनसेवक – देविदास कडू फिक्स नगरसेवक”
लोणावळा शहरातील जनसेवक म्हणून देविदास कडू यांची ओळख आहे. मागील एक ते दीड वर्षापासून ते लोणावळ्यात नगराध्यक्ष पदाची तयारी करत होते. यावर्षी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण आले असते तर देविदास कडू हेच नगराध्यक्ष झाले असते, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. मात्र नशिबाने त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर त्यांनी होम वॉर्ड असलेल्या भांगरवाडी प्रभागातून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी भाजपाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी प्रथमता उमेदवारी जाहीर केलेले माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी एक पाऊल मागे घेत आपल्या जागेवर देविदास कडू यांना उमेदवारी दिली.
भांगरवाडी प्रभागामध्ये भाजपाची निर्विवाद ताकद आहे. देविदास कडू यांनी मागील काही दिवसांपासून या सर्व भागांमध्ये केलेली कामे पाहता त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देणे कोणतेही राजकीय पक्षाला शक्य नसल्याने सर्वांनीस या ठिकाणी आपला उमेदवार न देण्याचे निश्चित केले, आमदार सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये देविदास कडू यांनी मला मदत केली होती, त्यामुळे मी या ठिकाणी उमेदवार देणार नाही असे घोषित देखील केले होते. त्यामुळे कडू यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाला होता.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
