व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपा नेते देविदास कडू यांनी घडविला इतिहास ! भांगरवाडीमधून लोणावळा नगरपरिषदेवर बिनविरोध नगरसेवक । Lonavala

देविदास कडू यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार न देण्याचे आमदार सुनील शेळके यांनी जाहीर केले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 20, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
BJP leader Devidas Kadu creates history Unopposed corporator in Lonavala Municipal Council from Bhangarwadi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाने आपले नगरसेवक पदाचे खाते खोलले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी भांगरवाडी प्रभाग क्रमांक सात मधील भाजपाचे नगरसेवक देविदास भाऊसाहेब कडू यांच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नूतन विवेक घाणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे देविदास कडू हे बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. आता केवळ त्यांच्या औपचारिक निवडीची घोषणा बाकी आहे.

देविदास कडू यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार न देण्याचे आमदार सुनील शेळके यांनी जाहीर केले होते. तसेच अन्य पक्षांकडेही सक्षम उमेदवार नसल्याने कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. नूतन घाणेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे देविदास कडू हे प्रभाग क्रमांक सात मधून बिनविरोध नगरसेवक झाले आहेत.

लोणावळा नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये भांगरवाडी प्रभागातून आजपर्यंत कोणीही बिनविरोध झालेले नाही. देविदास कडू यांनी हा इतिहास रचला असून या भागातून प्रथमच बिनविरोध होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला आहे.

“लोणावळ्यातील जनसेवक – देविदास कडू फिक्स नगरसेवक”
लोणावळा शहरातील जनसेवक म्हणून देविदास कडू यांची ओळख आहे. मागील एक ते दीड वर्षापासून ते लोणावळ्यात नगराध्यक्ष पदाची तयारी करत होते. यावर्षी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण आले असते तर देविदास कडू हेच नगराध्यक्ष झाले असते, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. मात्र नशिबाने त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर त्यांनी होम वॉर्ड असलेल्या भांगरवाडी प्रभागातून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी भाजपाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी प्रथमता उमेदवारी जाहीर केलेले माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी एक पाऊल मागे घेत आपल्या जागेवर देविदास कडू यांना उमेदवारी दिली.

भांगरवाडी प्रभागामध्ये भाजपाची निर्विवाद ताकद आहे. देविदास कडू यांनी मागील काही दिवसांपासून या सर्व भागांमध्ये केलेली कामे पाहता त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देणे कोणतेही राजकीय पक्षाला शक्य नसल्याने सर्वांनीस या ठिकाणी आपला उमेदवार न देण्याचे निश्चित केले, आमदार सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये देविदास कडू यांनी मला मदत केली होती, त्यामुळे मी या ठिकाणी उमेदवार देणार नाही असे घोषित देखील केले होते. त्यामुळे कडू यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाला होता.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana 


dainik maval jahirat

Previous Post

काले-कुसगांव जिल्हा परिषद गट : भाजपाचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर दळवी यांची जोरदार मोर्चेबांधणी, कार्यकर्त्यांचेही पाठबळ

Next Post

पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वितरीत ; महाराष्ट्रातील ९० लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ८०८ कोटी २५ लाख थेट जमा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PM-Kisan-Samman-Nidhi

पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वितरीत ; महाराष्ट्रातील ९० लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ८०८ कोटी २५ लाख थेट जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.